esakal | दिलासादाय..नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक

बोलून बातमी शोधा

दिलासादाय..नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक
दिलासादाय..नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक
sakal_logo
By
सचिन जोशी


जळगाव : फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मार्च व एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आणि मृत्यूही वाढले. मात्र, या स्थितीत एप्रिलमध्ये नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या साडेचारशेने अधिक असल्याची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे.

हेही वाचा: जळगावकरांच्या तक्रारींचे घरबसल्या निरसन

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आणि ही दुसरी लाट अधिक तीव्रतेने पसरू लागली. मार्च व एप्रिलमध्ये तीव्रता प्रचंड वाढून रोज हजार, बाराशेपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत.

चाचण्या वाढून रुग्णसंख्या स्थिर
दुसरीकडे प्रशासनाने चाचण्याही वाढविल्या आहेत. फेब्रुवारी व मार्चमध्ये कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी (चाचण्यांच्या तुलनेत आढळणारे रुग्ण) २५ ते ३० टक्क्यांवर पोचला होता. तो आता १०-१२ टक्क्यांच्या आसपास आहे. चाचण्या वाढविल्यानंतरही रुग्णसंख्या स्थिर असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: अठरा ते ४४ वयोगटातील लसीकरण; जळगाव शहरात पाच सेंटर

कोरोनामुक्त वाढले
१ ते ३० एप्रिलदरम्यान सुमारे ३३ हजार १४६ रुग्ण आढळून आले, असे असले तरी, दिलासादायक बाब म्हणजे याच तीस दिवसांत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. महिनाभरात तब्बल ३३ हजार ६०९ रुग्ण बरे झाले. नव्या बाधितांच्या तुलनेत ही संख्या ४६३ ने अधिक आहे.


हेही वाचा: ऑक्सिजनअभावी दोघांचा मृत्यू; पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

५४१ जणांनी जीव गमावला

कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा समाधान देणारा असला तरी गेल्या एप्रिलमध्ये तब्बल ५४१ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील ही कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक बळींची संख्या आहे.

एप्रिल महिन्यात..
सर्वाधिक रुग्ण : ११९० : ८ एप्रिल
सर्वाधिक बरे : १२२२ : २ एप्रिल
सर्वाधिक मृत्यू : २४ : १९ एप्रिल

संपादन- भूषण श्रीखंडे