जळगाव

शिवसेना उमेदवारांचे नाव, सह्यांवर आक्षेप; हरकत फेटाळल्याने भाजप जाणार कोर्टात 

सचिन जोशी

जळगाव : महापौर व उपमहापौर निवड प्रक्रियेदरम्यान भारतीय जनता पक्षाने शिवसेना उमेदवारांसह त्यांच्या सूचक, अनुमोदकांची नावे व स्वाक्षऱ्यांवर घेतलेली हरकत पीठासन अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. त्यामुळे या निर्णयाविरोधात भाजप आता न्यायालयात जाणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत सत्तांतराचे नाट्य सुरू असून, रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. गुरुवारी अकराला महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली. भाजपने सुरवातीलाच शिवसेनेचे महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांची नावे, त्यांना सूचक व अनुमोदक बनलेल्या सदस्यांची नावे राजपत्रातील (गॅझेट) नावाप्रमाणे नाहीत. शिवाय, या सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांमध्येही तफावत आहे. त्यामुळे दोन्हींचे अर्ज अवैध ठरविण्यात यावे, अशी लेखी हरकत घेतल्याची माहिती स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे- पाटील यांनी पत्रकारांना दिली. 

हरकत फेटाळली 
पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नावांमध्ये कोणतीही तफावत नाही यासह स्वाक्षऱ्यांवर घेतलेली हरकत फेटाळून लावली. भाजपने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून पीठासन अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे स्पष्ट केले आहे. 


राज्यातील सत्तेचा दुरुपयोग 
राज्यात शिवसेनेची सत्ता असून नगरसेवक फोडण्यापासून, घोडेबाजार, आर्थिक देवाणघेवाण आदी प्रकार सत्तेच्या दुरुपयोगातून सर्रास होत आहे. आता निवड प्रक्रियेतही सेना उमेदवारांच्या अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी असताना पीठासन अधिकाऱ्यांनी आमची हरकत फेटाळली. राज्यातील सत्तेचा शिवसेनेकडून दुरुपयोग होत असून लोकशाहीची पायमल्ली होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT