Unmesh Patil sakal
जळगाव

जळगाव : खासदार उन्मेश पाटलांबद्दल मध्यरात्री रेखाटला आक्षेपार्ह मजकूर

आमदार सुरेश भोळे यांच्या निवास व कार्यालयाबाहेरही प्रकार; अज्ञात समाजकंटकांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पालकमंत्र्यांच्या पाळधी येथील निवासस्थानासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री निषेधाची रांगोळी काढल्यानंतर वातावरण तापले होते. त्यातच आता मंगळवारी रात्री आमदार राजूमामा भोळेंच्या निवास व कार्यालयाबाहेर अज्ञात व्यक्तींनी खासदार उन्मेश पाटलांबद्दल (Unmesh Patil)आक्षेपार्ह मजकूर (Offensive text) लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दोन दिवसांपूर्वी पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाचा निषेध म्हणून रांगोळी काढून घोषणाबाजी केली होती. युवासेना व शिवसेनेने त्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून त्यामुळे सेना व भाजपतील वातावरण तापले आहे.

आता खासदारांबद्दल मजकूर

अशातच जळगाव शहरात अज्ञात व्यक्तींनी आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्या रिंगरोड येथील घराबाहेर व .क्रीडा संकुलासमोरील कार्यालयाबाहेर भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहून ठेवल्याने तणाव निर्माण झाला आहे.

भाजपची कारवाईची मागणी

भाजपने या प्रकाराचा निषेध केला आहे. रात्री बाराला टाटा हॅरिअर या चारचाकी वाहनातून येऊन चार अज्ञात महिला व चार पुरुषांनी या ठिकाणी गलिच्छ आणि शिवराळ भाषेत रांगोळीने लिखाण केले आहे. लिखाणातून खासदार उन्मेश पाटील व आमदार भोळे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. अशा अज्ञात समाजकटंकांविरुद्ध गंभीर कारवाई करून सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी त्वरित कारवाई झाली नाही तर, कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यास त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT