BJP-NCP कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, पराभूत उमेदवाराच्या पुतणीनं गमावला जीव

साक्रीत पराभूत उमेदवाराच्या मुलीच्या मृत्यूनंतर तणाव
nagar panchayat election
nagar panchayat election sakal

साक्री : येथील नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारी (ता. १९) सायंकाळी हाणामारीच्या घटनेने निवडणुकीस गालबोट लागले. यात भाजपचे पदाधिकारी व प्रभाग अकरामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवार ताराबाई जगताप यांचा मुलगा गोटू जगताप यांच्यात हाणामारी झाली. या घटनेत गोटू जगताप यांची विवाहित पुतणी मोहिनी जाधव (वय ३५) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेले श्री. जगताप यांचे नातलग, समर्थक, तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर ठिय्या देत मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. यामुळे तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

nagar panchayat election
Ahmednagar Corona update | कोरोनाचे सहा हजार 777 आंतररुग्ण

येथील नगरपंचायत निकालात सत्तापरिवर्तन होऊन भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आली. यामुळे भाजपच्या विजयी उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष केला. सायंकाळच्या सुमारास भाजप कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. याच वेळी प्रभाग ११ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवार ताराबाई जगताप यांचे पुत्र गोटू त्या रस्त्याने जात असताना त्यांच्यात आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान पुढे हाणामारीत झाले. जगताप यांना मारहाण होत असल्याचे त्यांच्या नातेवाईक व समर्थकांना कळताच तेदेखील घटनास्थळी धावून आले. या वेळी जगताप यांची बहीण मोहिनी जाधव यादेखील उपस्थित होत्या. हाणामारीदरम्यान धक्का लागल्याने त्या जमिनीवर कोसळल्याचे उपस्थितांनी सांगितले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

nagar panchayat election
ओमीक्रॉनची धास्ती; 'वर्क फ्रॉम होम’ एप्रिलपर्यंत?

दरम्यान, मोहिनी जाधव यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाइकांनी, तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, समर्थकांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर ठिय्या देत, मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलन सुरू केले. यामुळे वातावरण मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण बनले असून, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्त ठेवून होते.

फीट आल्याने मृत्यू?

मोहिनी जाधव यांचा फीट आल्याने मृत्यू झाल्याचा दावा साक्री पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने किंवा सीआयडीकडे हा गुन्हा वर्ग करून सखोल तपास करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com