Cattle rescued (File Photo) esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका; चाळीसगाव पोलिसांची सतर्कता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : गोवंशाच्या जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या दोघांना हत्यारांसह शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील जनावरांची कत्तल होण्यापासून मुक्तता केली.

याबाबत माहिती अशी, शहरातील हुडको कॉलनी व नागदरोड परिसरात मांसासाठी गोवंश जातीच्या जनावरांचा कत्तलीसाठी वापर होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, रात्री गस्त घालणाऱ्या पथकाला त्यांनी सूचना दिल्या. (police Rescue animals going to slaughter jalgaon crime news)

शुक्रवारी (ता. ८) पहाटे चारच्या सुमारास उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार नितीन वाल्हे, महेंद्र पाटील, रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर गीते, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, भरत गोराळकर हे गस्त घालत असताना सदानंद हॉटेलजवळ दोघे जण दुचाकीवरून एका पिशवीत काही तरी घेऊन जाताना आढळले.

त्यांच्यावर संशय बळावल्यानंतर त्यांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, ते पळून जाऊ लागले. त्यांचा पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना छाजेड ऑईल मिलजवळ पकडले असता, चौकशीत शेख अनिस शेख गफूर कुरेशी (४८, रा. उर्दु बालवाडीच्या मागे, मोहम्मदिया मशिदसमोर, इस्लामपुरा, चाळीसगाव) व मुस्ताक खान हारुन खान कसाई (४०, रा. अमोल बुट हाउसच्या बाजूला, रथगल्ली, कसाईवाडा, चाळीसगाव) अशी त्यांची नावे त्यांनी सांगितली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्या पिशवीत लहान लाकडी दांड्याची लोखंडी धारदार कुऱ्हाड, दोन लोखंडी धारदार सुरे व धार लावण्याची गोलाकार लांब कानस मिळून आली. त्यांनी शेख अनिस शेख गफूर याच्या घराजवळच्या गोठ्यात गोवंश जातीची जनावराची कत्तल करण्यासाठी नेली जात असल्याची माहिती दिली.

त्यानुसार, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक निरीक्षक सागर ढिकले यांच्यासह पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून चार गोवंश जातीचे जनावरे व कत्तलीसाठीचा इतर मुद्देमाल असा एकूण ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

त्यांच्या ताब्यातील चारही जनावरांची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी दोघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार महेंद्र पाटील करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT