Jalgaon Cyber Crime : ग्रामिण भागातही पोहचला सोशल मिडीयाचा उपद्रव; ‘मार्फ’करुन फोटो व्हायरल

Photo Morphing Crime
Photo Morphing CrimeSakal

Jalgaon Crime News : पाचोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय तरुणीचा फोटो मार्फींग करुन इंस्टाग्रामवर बनावट खात्यावरुन व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याबाबत पिडीत तरूणीच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मागील ३ ते ६ सप्टेंबर या तिनच दिवसांत इस्टाग्रामवर बनावट खाते उघउून त्याद्वारे तिचे मार्फ केलेले फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. ( girl fake Instagram account was created morphed photos went viral cyber crime news)

त्यासाठी संशयिताने पिडीतेच्या नावाने चक्क दोन बनावट खाते तयार केले.

पिडीतेची बदनामी होण्याच्या उद्देशाने तयार केलेले हे फोटो नातेवाईक व इतर मंडळींकडे व्हायरल करण्यात आले. त्यावर, नातेवाईक परिचितांमध्ये संतप्त प्रक्रिया उमटून तत्काळ त्यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Photo Morphing Crime
Jalgaon Crime : तक्रार घेऊन आला अन्‌ व्हीडीओ व्हायरल केला; तरूणास चोप

नेहमीचा प्रकार

सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्या तरुणी, महिला व खास करुन महाविद्यालयीन विद्यार्थिनिंनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

गरज नसताना ॲंड्राईड फोनचा वापर करु नये आणि वापर करतानाही त्याद्वारे सोशल मिडीया साईटवरील अनपेक्षीत लिंकला उगाच क्लिक करुन आर्थीक संकटासह परिचितांमध्ये प्रतिमा मलीन होण्याची अधीक भिती असते. शंका येताच जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.

Photo Morphing Crime
Crime News: मुंबईत एअर होस्टेसची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com