Sanjay Raut
Sanjay Raut esakal
जळगाव

Sanjay Raut : ...तर त्यासाठी मर्दानगीही असावी लागते : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अजितदादा यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली तर बिघडले कुठे? त्यांची अपेक्षा योग्य आहे, काही जण तर लायकी नसतानाही तोडफोड आणि जुगाड करून मुख्यमंत्री होतात. (sanjay raut statement about ajit pawar and gulabrao patil jalgaon news)

त्यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली तर बिघडले कुठे? पंतप्रधान चांगले काम करीत असतील तर आम्हीही त्यांची स्तुती करू, असे वक्तव्य शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी शनिवारी (ता. २२) येथे केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रविवारी (ता. २३) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या पा‍र्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगाव येथील हॉटेल के. पी. प्राइड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेस जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याबाबतीत बोलताना खासदार राऊत म्हणाले, की सत्ता आणि पैशाच्या जोरावर राज्याचे मंत्री धमकी देत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था असल्याचे सांगणारे गृहमंत्री कुठे आहेत? मुख्यमंत्री कुठे आहेत? मात्र अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाहीत. आम्ही पळपुटे नाही, डरपोकही नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही त्याचा सामना करण्यास सज्ज आहोत.

मर्दानगी असावी लागते

पालकमंत्री पाटील यांनी पक्षांतर केल्याबाबत टोला लगावला. ते म्हणाले, पळपुटेपणा करून हे शिंदे यांच्याबरोबर गेले. केवळ दाढी, मिशी असून चालत नाही, तर त्यासाठी मर्दानगीही असावी लागते. आमचाही छळ होत आहे, आम्हालाही कारागृहात जावे लागले. परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. परंतु यांना वर्षानुवर्षे शिवसेनेने दिलं, मोठे केले तरी हे पळून गेले. आम्ही शिंदे यांच्याबरोबर का गेलो? याचे उत्तर त्यांनी द्यावे. जनता त्यांना निवडणुकीत उत्तर देणारच आहे.

‘महाविकास आघाडी’च सत्तेवर येईल

राज्यातील महाविकास आघाडीच्या वज्रमुठीबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, एका पक्षाची नव्हे तर तीन पक्षांची ही वज्रमूठ आहे, ती कायम एकच राहील. २०२४ मध्ये राज्यात महाविकास आघाडीच सत्तेवर येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT