ST workers call off strike and return to work from Gudipadva Gulabrao Patil jalgaon
ST workers call off strike and return to work from Gudipadva Gulabrao Patil jalgaon sakal
जळगाव

एसटी कामगारांनी संप मागे घेऊन गुढीपाडव्यापासून कामावर यावे; गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एसटी कामगार संपाचा आता अतिरेक होतो आहे, कामगारांनाही त्यांचे कुटुंब आहे. त्यांनी त्याचा विचार करून संप मागे घेऊन गुढीपाडव्यापासून कामावर हजर व्हावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.एसटी कामगारांनी ३१ मार्चपर्यंत संप मागे घेऊन कामावर यावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

याबाबत जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की एसटी कामगार संपाचा आता अतिरेक होतो आहे, सरकारने सर्व मागण्यांबाबत आश्‍वासन दिले आहे. कामगारांनी आपली मागणी कायम ठेवून कामावर यावे, गुढीपाडव्यापासून त्यांनी कामावर हजर व्हावे, असे आपले आवाहन आहे. शेवटी कामगारांना घरदार आहे, कुटुंब आहे, याचाही त्यांनी विचार करावा. नेते त्यांना चुकीचा मार्ग दाखवीत आहेत, आपल्या मागण्या मान्य होतील या भावनेच्या भरात कामगारही त्यांच्या मागे जात आहे. परंतु याच कर्मचाऱ्यांचे नेते वकील आहेत, त्यांना सर्व परिस्थितीची माहिती आहे, त्यांनी आता कामगारांच्या डोक्यात असलेला संभ्रम काढून त्यांना कामावर हजर होण्यास सांगावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT