strike of Tehsildar Naib Tehsildar ended jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Strike News : तहसीलदार, नायब तहसीलदारांचा संप मिटला! कामाला सोमवारपासून गती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Strike News : नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांना ग्रेड पे ४८०० रुपये मिळावा, या मागणीसाठी गेल्या सोमवार (ता. ३)पासून तहसीलदार, नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले होते. (strike of Tehsildar Naib Tehsildar ended jalgaon news)

गुरुवारी (ता. ६) सायंकाळी संप मिटला. शुक्रवारी (ता. ७) शासकीय सुटी असल्याने शासकीय कार्यालये बंद होती. शनिवार (ता. ८) नंतर रविवार (ता. ९), अशा सलग तीन दिवस सुटी आल्याने आता सोमवार (ता. १०)पासूनच महसूलच्या कामकाजाला गती येणार आहे.

संप काळात कर्मचारी कामावर होते. मात्र, तहसीलदार, नायब तहसीलदार नसल्याने नागरिकांच्या प्रकरणांवर सह्या करणार कोण, अशी स्थिती तहसीलदार कार्यालयात होती. मार्च महिन्यात सात दिवस शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यामुळे नागरिकांची कामे रखडली होती. नंतर तहसीलदार, नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन केल्याने नागरिकांची कामे पुन्हा ठप्प झाली होती.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शासनाने २०१५ मध्ये नायब तहसीलदारांना ४८०० ग्रेड पे देण्याबाबत तत्वतः मान्यता दिली. त्यानंतर आलेल्या बक्षी समितीने या मागणीचा विचार केला नाही. शासनाने याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन सुरू केले होते.

महसूल मंत्र्यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मागण्या मंजुरीचे आश्‍वासन मिळाले आहे. त्यामुळे संप मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. सोमवार (ता. १०)पासून नियमित कामकाजाला सुरवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT