Night-School
Night-School 
काही सुखद

रात्रशाळेने दिले त्यांना आकांक्षांचे पंख

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘लहानपणी विहिरीवर पाणी आणायला जायचे, तेव्हा वाटेत हायस्कूल लागायची. हायस्कूलच्या वाटेने जाताना हंडा डोक्‍यावर ठेवून वर्गाच्या बाजूला डोकवून कानावर पडेल ते ऐकत बसायचे. शिकायची खूप इच्छा होती, परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे ते शक्‍य नव्हत. पण शिकण्याची ओढ स्वस्थ बसू देईना! भावंडांचे त्यानंतर मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आता उशिरा का होईना, पण पुन्हा अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करायला सुरवात केली आहे, असे सुमनताई सांगत होत्या.

मुळशी तालुक्‍यातील कोळवंद गावातील सुमन नाईक मार्केट यार्ड परिसरात राहतात. शिवणकामात तरबेज असणाऱ्या सुमनताई शिवणकाम व्यवसायात खंबीरपणे पावले रोवून आहेत. त्यांच्यासारख्या अनेकांना शिक्षणाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आकांक्षांचे पंख देणारे सरस्वती मंदिर संस्थेचे पूना नाइट हायस्कूल यंदा शताब्दी वर्ष साजरे करत आहेत. या शाळेची स्थापना १९१९-२०मध्ये झाली. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्यांसाठी ज्ञानाची दालने खुली करून देणाऱ्या या शाळेत आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. शंभर वर्षांच्या वाटचालीत शाळेने सुमनताईंसारख्या अनेकांना नवी उभारी दिली.

सुमनताई लहान असतानाच त्यांच्यावरील मातृछत्र हरपले. दोन लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी लहानपणीच त्यांच्या खांद्यावर आल्याने शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर पितृछत्रही हरपले आणि घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यानंतर लग्न झाले. भावंडांचे शिक्षण केले.

मुलीचे आर्किटेक्‍चरचे आणि मुलांचे बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुमनताई पुन्हा शिक्षणाकडे वळाल्या. रिक्षाचालक अनिल बोराटे पन्नासाव्या वर्षी अपूर्ण राहिलेले शिक्षणाचे स्वप्नं पूर्ण करू पाहत आहेत. ते नुकतीच नववीत उत्तीर्ण होऊन अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत.

‘पाचवी नापास झालो होतो, त्यानंतर शिक्षणात अंतर पडले. बॅंकेत धनादेश भरताना, पैसे काढताना स्लिप भरण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागत होता. परंतु आता शिकल्याने अनेक कामे आत्मविश्‍वासाने करणे शक्‍य होते,’’ असे बोराटे यांनी सांगितले.

यवतमाळ येथील वैष्णवी भोरे शिक्षणासाठी पुण्यात मावशीकडे आल्या आहेत. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले होते. परंतु त्यांनी पूना नाइट स्कूलमधून दहावीचे शिक्षण पूर्ण केले आणि आता त्या विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत आहेत. उत्तमनगर येथील हॉस्पिटलमध्ये सध्या त्या परिचारिका आहेत. त्यांना नर्सिंगमधून बी.एस्सी. शिक्षण पूर्ण करायचे आहे.

प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत सोलापूर जिल्ह्यातील देवीकोटा गावातून काजल शिवशरण पुण्यात आल्या. सध्या त्या एका हॉटेलमध्ये काम करून पूना नाइट स्कूलमध्ये शिकत आहेत. त्या दहावीत असून शिकण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी बाळगली आहे. 

सुमनताईंपासून ते काजल यांच्यासारख्या अनेकांना या शाळेने आशेचा नवा किरण दाखवीत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT