काही सुखद

#Education पारधी वस्तीवर तेवतेय शिक्षणाची ज्योत

गायत्री तांदळे

पुणे : रस्त्यावर भीक मागणारी मुले सर्वांना दिसतात; परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करत बरेच जण पुढे जातात, तर काही जण त्यांना मदत करतात. ही मुलं शिक्षणापासून वंचित असतात. त्यांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज व पूनम तेलंग या दांपत्याची धडपड सुरू आहे. त्यामुळे भीक मागणारे हात बाराखडी गिरवताना दिसत आहेत. 

कात्रज येथील वंडरसिटीजवळील पारधी वस्तीतील मुलांना शिकविण्याचे काम पूनम तेलंग यांनी चार वर्षांपूर्वी सुरू केले. चार मुलांपासून सुरू करण्यात आलेल्या शाळेत आता 42 मुलं शिक्षण घेताहेत. सुरवातीचे काही दिवस मुलांचे पालक विरोध करीत होते. "आमची मूल शिकून काय करणार? त्यापरिस त्यांनी भीक मागितलं तर एक येळचं खायला तरी मिळल.' असा त्यांचा व्होरा होता. पण तेलंग दांपत्यानं त्यांची पुन्हा पुन्हा समजूत काढून त्यांना तयार केले.

अखेरीस "पोरांच्या एक येळच्या खाण्याची जिम्मेदारी घेत असाल तरच त्यांना शिकायला पाठिवतो,' अशी अट पालकांनी घातली. आर्थिकदृष्ट्या त्यांची अट तेलंग दांपत्याला परवडणारी नव्हती; पण तरीही ती मान्य करीत त्यांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. 

मुलं म्हणजे भीक मागून उत्त्पन देणारे साधन, याच दृष्टिकोनातून या वस्तीतील मोठी माणसं त्यांच्याकडे बघतात. काहींनी मुलांचे शिकणे मान्य केले असले तरी वस्तीतील निम्म्या कुटुंबांचा आजही याला विरोधच आहे. त्यातून या कुटुंबांकडून आजही तेलंग दांपत्याला धमक्‍या दिल्या जात आहेत. पण त्याला न जुमानता हे दांपत्य ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करीत आहे. 

येथील मुलांची सरकारी कागदपत्रे तयार करणे, त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणं तसेच मनोरुग्णांना आधार मिळवून देण्याचे कामही तेलंग दांपत्य करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT