काही सुखद

निघोटवाडीत दीड किलोमीटरहून आणले पाणी

सकाळवृत्तसेवा

मंचर - निघोटवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीने दीड किलोमीटर अंतरावरील डिंभे उजवा कालव्यातून पाइपलाइन करून पाणी उचलले. दोन खाणी व एका शेततळ्यात सुमारे दोन कोटी लिटर पाणीसाठा केला. त्याद्वारे पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. चारा पिकासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. 

निघोटवाडी हे गाव घोड नदी व डिंभे उजवा कालव्याच्या पाण्यापासून वंचित आहे. गावात एप्रिलपासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. नळ योजनेचेही पाणी गावाला कमी पडत होते. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालल्याने ग्रामस्थ  चिंतेत होते. 

सरपंच नवनाथ निघोट, मंचर बाजार समितीचे संचालक शिवाजीराव निघोट, माजी सरपंच महादू निघोट, नरेंद्र निघोट, योगेश निघोट, पाटबंधारे खात्याचे सेवानिवृत्त उपअभियंता श्‍यामराव निघोट, गोरख निघोट, नीलेश निघोट यांच्यासह प्रमुख ग्रामस्थांची बैठक झाली. गावच्या पश्‍चिमेला असलेल्या टेकडीवर वीस वर्षांपूर्वी खोदलेल्या खाणी व एका शेततळ्यात पाणीसाठा केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल. त्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पाटबंधारे खात्याकडून डिंभे उजव्या कालव्यातील पाणी उचलण्याची परवानगी ग्रामपंचायतीने घेतली. वीस अश्वशक्तीचे वीजपंप व पाइपलाइनही तयार केली. त्या माध्यमातून दोन खाणी व शेततळ्यात पाणीसाठा करण्यात आला. शेततळ्यातील पाणीसाठ्यामुळे ५०० हून अधिक शेळ्या-मेंढ्या व गुरांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. गावठाण व परिसरातील आठ विंधनविहिरींना त्याचा फायदा झाला. पाण्याची व्यवस्था झाल्याने नळ योजनेवरील ताण कमी झाला. गावकऱ्यांना नळाद्वारे दररोज पाणी मिळत आहे. आजूबाजूच्या तीस विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. सुकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले. चारा उपलब्ध झाल्याने पशुधन विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी बदलला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT