कोकण

मुरुड-दापोली-पुणे बसला अपघात; सतरा प्रवासी जखमी

सुनील पाटकर

महाड : दापोली येथून पुण्याकडे जाणा-या एसटी बसला महाड तालुक्यातील रेवतळे घाटात टोकवाडी येथे झालेल्या अपघातात बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले.चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला अपघातातील बस एका झाडाला टेकल्याने पुढील अनर्थ टळला. आज सकाळी सव्वा दहा वाजता ही घटना घडली .

दापोली मुरुड येथून सकाळी नऊ वाजता पुणे पिंपरी चिचवड येथे जाण्यासाठी निघालेली ही एसटी बस सव्वा दहाच्या सुमारास महाड जवळील रेवतळे घाटात घाट उतरत असतांना एका वळणावर चालक प्रभाकर गायकवाड याचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला पलटी झाली.

बस पलटी होताच आतील प्रवाशांच्या डोक्याला मार बसल्याने ते जखमी झाले. रेवतळे मोहल्ला ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करुन प्रवाशांना बाहेर काढले. एसटी अधिकारी व रुग्णवाहिका त्वरित येथे रवाना झाल्या. या अपघातात अक्षय कासारे (दाभट), प्रभाकर गायकवाड (पुणे), उर्मिला बटावले (मुरुड), शिल्पा केळकर व शरद केळकर (पुणे), हेमलता मोरे (दापोली), सुनंदा तांबट व मंगेश तांबट (दाभोळ), अंजुम सय्य्द (दापोली), अशोक पवार (सोंडेघर), चांदबीबी खान (महाबळेश्वर), फौजिया कोंडेकर (शिरवली), अशोक येरवणकर (दापोली), मिना कुसगावकर व चंद्रकांत कुसगावकर (दाभोळ ), राधिका बेणेरे मुरुड व नारायण पवार (दापोली) हे जखमी झाले आहेत. जखमींना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉ. भास्कर जगताप व पथकाने यांनी त्यांच्यावर उपचार केले. जखमींमध्ये नऊ जेष्ठ नागरिक आहेत. एसटीकडून जखमींना मदत करण्यात आली आहे. अपघातग्रस्त बस एका झाडाला टेकली नसती तर पन्नास फूट खोल कोसळून मोठी दुर्घटना झाली असती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT