Sugarcane
Sugarcane sakal
कोकण

हेक्टरी अवघा ४० टन ऊस; मार्गदर्शनाची गरज : शास्त्रोक्त लागवड केल्यास उत्पादनवाढ

एकनाथ पवार

वैभववाडी : जिल्ह्यात ऊस लागवड सुरू होऊन २० वर्षांचा काळ लोटला आहे; परंतु अजूनही ऊस लागवडीत प्रयोग होऊन त्याचा उत्पादन वाढीत परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात हेक्टरी अवघा ४० टन ऊस सरासरी उत्पादित होतो. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने ऊस लागवड आणि व्यवस्थापनाचे ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कारखाना प्रशासन आणि कृषी विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० वर्षांपूर्वी ऊस लागवड व्हायची; परंतु त्याखालील क्षेत्र हे नगण्य होते. कारखाना निर्मितीनंतर ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली. दरवर्षी दुप्पट किंवा तिपटीने ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले; परंतु सुरुवातीपासून ऊस उत्पादनात वाढ झाली नाही. सुरुवातीच्या काळात येथील शेतकऱ्यांना ऊस लागवडीचे नसलेले ज्ञान, नीटनेटक्या व्यवस्थनाविषयी अपुरी माहिती यामुळे उत्पादन वाढ झाली नाही; परंतु त्यानंतर देखील हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसत नाही. हेक्टरी उत्पादकता ही ४० ते ५० हेक्टरच्या जवळपासच राहिली आहे.

एकीकडे राज्यातील शेतकरी, त्या त्या भागातील विद्यापीठे ऊसलागवडीबाबत विविध प्रकारचे संशोधन करून उत्पादनवाढीसाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकरी तर एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेत असल्याची उदाहरणे आहेत. परंतु २० वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्गात उत्पादनवाढीसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. सन २०१८-१९ मध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्र १ हजार ५३१ हेक्टर होते आणि उत्पादन ५१ हजार ६०७ टन होते. त्यावर्षी प्रतिहेक्टरी उत्पादन ३३ टन होते. त्यामुळे सरासरी हेक्टरी उत्पादन हे ४० ते ५० टन इतकेच राहिले आहे.

ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढताना ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभाग आणि कारखान्याने प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, तशा स्वरुपाचे दखलपात्र प्रयत्न झालेले नाहीत. अपवादात्मक प्रयत्न झालेही असतील; परंतु ते पुरे पडले नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे निव्वळ लागवड क्षेत्र वाढून उपयोग नाही, तर जिल्ह्याची उत्पादकता वाढली तरच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

पारंपरिक पद्धतीचा होतोय वापर

उसाच्या रोपनिर्मितीपासून ऊस लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यामध्ये अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. सरीमधील अतंर, ठिबक सिंचनाचा वापर, उत्पादन वाढीसाठी नियमित खतांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झालेली दिसून येते; परंतु जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पारंपारिक पद्धतीचाच अवलंब करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतीत बदलाची मानसिकता शेतकऱ्यांनी स्वीकारली पाहिजे.

तरच ऊसशेती शेतकऱ्यांना परवडेल

ऊस लागवडीसाठी येणारा खर्च पाहता एकरी साधारणपणे ५० ते ६० टन ऊस उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले, तर ऊसशेती शेतकऱ्यांना परवडते, असे काही जाणकार शेतकऱ्यांकडुन सांगितले जाते; परंतु जिल्ह्याची उत्पादकता पाहिल्यास जिल्ह्यात ऊसशेती परवडते असे दिसत नाही.

ऊस विकास योजनेंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागवड, खत व्यवस्थापनाची माहिती दिली जाते. प्रत्येक गावात ५० ते ६० शेतकरी एकत्र करून हे ज्ञान पोहोचविले जाते. याशिवाय काही शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये देखील प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खताची मात्रा, जैविक खते, एक डोळा पद्धत लागवड तंत्रज्ञान, नव्याने विकसित झालेल्या उसाच्या जाती याची माहिती कारखान्याच्या माध्यमातून दिली जाते. काही शेतकऱ्यांचा ऊस विकास योजनेत देखील समावेश केला आहे.

- सुनील पाटील, ऊस विकास अधिकारी, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, असळज

ऊस उत्पादन वाढावे यासाठी गेल्यावर्षी कृषी विभागाच्या माध्यमातून नापणे येथे कार्यशाळा घेतली होती. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी आणखी काही ऊस उत्पादक गावांमध्ये प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

- सचिन कांबळे, तालुका कृषी अधिकारी, वैभववाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT