कोकण

नाणार प्रकल्पात पक्षप्रमुखांची भूमिका तीच माझी - अनंत गीते

सकाळवृत्तसेवा

पुणे - नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा सुरवातीपासूनच विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात आणण्यात येणार या केवळ अफवा आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. नाणार रिफायनरीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी भूमिका तीच माझीही भूमिका आहे. त्यामुळे नाणार रायगड जिल्ह्यात आणणार यावर विश्‍वास ठेवण्याचे कारण नाही, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी पुण्यात स्पष्ट केले.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाणार येथे होणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेचा सुरवातीपासून विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याच्या बातम्या काही ठिकाणी आल्या होत्या.

यासंदर्भात पुण्यात बोलताना गीते यांनी हा खुलासा केला. प्रकल्प रायगडला आणण्यात येणार ही चुकीची बातमी कुणीतरी जाणीवपूर्वक पसरवत असल्याचे गीते यांनी सांगितले.

नाणारबाबत शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी भूमिका आहे तीच विरोधाची भूमिका माझीही आहे. या विषयात माझी वेगळी भूमिका असण्याचा प्रश्‍नच येत नाही. मी पक्षाशी प्रतारणा करू शकत नाही, या शब्दात गिते यांनी या विषयावर भूमिका स्पष्ट केली.

नाणार प्रकल्पाला शिवसेनेने सुरवातीपासून विरोध केला आहे. या विषयावर शिवसेनेने वेळोवेळी आंदोलनेदेखील केली आहेत. मात्र, शिवसेनेच्या गीते यांच्याकडेच या विभागाची जबाबदारी असल्याने या विषयात शिवसेनेची पंचाईत झाली आहे. गेले तीन वर्षे हा विषय चर्चिला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प रायगडला आणण्यात येणार ही चर्चा आणि त्यावर गीते यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाला विशेष महत्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

SCROLL FOR NEXT