कोकण

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाड्.मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. डिसेंबर 2018 मध्ये घोषित होणार्‍या वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार कोमसापचे कोकणातील सभासद असणार्‍या लेखकांसाठी आहेत.

प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहेत. कादंबरी, कथा, कविता, समिक्षा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांकरिता पुरस्कार दिले जातील.

र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक पुरस्काराचा समावेश आहे. सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाईल.

विशेष पुरस्कार प्रत्येकी तीन हजार रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे सात पुरस्कार असून त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाङ्मय, संकीर्ण गद्य, नाटक-एकांकिका, वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. यात वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कवितासंग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरूरकर बालवाङ्मय पुरस्कार, वि. कृ. नेरूरकर संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, अरूण आठल्ये वाङ्मय संकीर्ण पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार आहेत.

पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती 30 सप्टेंबर 2018 पूर्वी पुरस्कार समिती प्रमुख, प्रा. अशोक रा. ठाकूर द्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे व्यवस्थापन पालघर, ता. जि. पालघर 401404 यांचेकडे पाठवाव्यात. त्यासाठीचे नियम व अटींचे माहितीपत्रक ashokthakur46@gmail.com या इमेल आयडीवरून मागवून घ्यावे. लेखक/कवी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई) असावा. तो कोकण मराठी साहित्य परिषदेचा आजीव सभासद असणे आवश्यक आहे. पुस्तकाचा वाङ्मय प्रकाराचा स्पष्ट निर्देश (कथा, कादंबरी, कविता, ललित वाङ्मय) लेखकाने पुरस्कारासोबत करावयाचा आहे. पुस्तके 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2018 या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत. पूर्वी पाठविलेली पुस्तके पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT