Atul Raorane Comment On Oppositers In Sindhudurg
Atul Raorane Comment On Oppositers In Sindhudurg  
कोकण

अतुल रावराणे म्हणाले,  नौटंकीवाले आता कुठे आहेत ? 

सकाळवृत्तसेवा

देवगड ( सिंधुदुर्ग ) - कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही तर सामाजिक बांधिलकी मानून भैरी भवानी ट्रस्टच्या माध्यमातून आपण काम करीत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन, प्रशासन चांगले काम करीत आहेत. मात्र केवळ राजकारण करून जनतेची दिशाभूल करणारे नौटंकीबाज जिल्ह्यात केवळ तोंड दाखवून आता कुठे गेले?, असा संतप्त सवाल शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी उपस्थित केला. केवळ जनतेच्या सोयीसाठी तालुक्‍याचा दौरा केल्याचेही त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर श्री. रावराणे यांनी तालुका दौरा केल्यावर पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे, संदेश सावंत - पटेल उपस्थित होते. यावेळी रावराणे यांनी नामोल्लेख टाळत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चांगले काम करीत आहेत. आपणही तालुक्‍यातील जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तालुका दौरा केला. काही गरीबांना मास घेणेही परवडत नसल्याने गावनिहाय मास उपलब्ध करून दिले. डॉक्‍टरांना पीपीई कीट दिली. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्याही अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये कोठेही राजकारण नसून समोर निवडणूकाही नाहीत. मात्र नौटंकीबाज जनतेला वाऱ्यावर सोडून आता कुठे जावून बसले आहेत? आपल्यावर टीका करणाऱ्या अशा नौटंकीबाजाना आपण घाबरत नाही. येथील जनतेशी आपली नाळ जुळल्यानेच गेली सुमारे बारा वर्षे सातत्याने जिल्ह्यात कार्यरत आहे. मात्र नौटंकीबहादूरांना जनतेच्या जीवाचे काही देणंघेणे नाही. 

..तर मी आहेच! 
रावराणे, घाटे, पटेल आदींनी तहसीलदार मारूती कांबळे यांची भेट घेतली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला कोणतीही गरज भासल्यास निःसंकोचपणे सांगावे, आपण आहोत अशा शब्दात अतुल रावराणे यांनी तहसीलदारांना आवाहन केले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT