Atul Raorane Meeting with senior NCP leader Ghate political marathi news
Atul Raorane Meeting with senior NCP leader Ghate political marathi news 
कोकण

जिल्हा बॅंक भाजपच्या हाती लागू देणार नाही ;  अतुल रावराणे

सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदुर्ग) : आगामी जिल्हा बॅंक निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी आज जामसंडे येथे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बॅंक निवडणूक लढवली जाणार असल्याने ही भेट घेतल्याचे  रावराणे यांनी सांगितले. भाजपने सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा कोणताही आटापिटा केला तरी जिल्हा बॅंक त्यांच्या हाती लागू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


जिल्ह्याच्या राजकारणामधील आगामी काळातील महत्वाचा टप्पा मानला जाणारी जिल्हा बॅंक निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सहकारातील वातावरण अधिकच ढवळले. त्यातच आगामी निवडणूक जिंकण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आतापासून नेत्यांच्या गाठीभेटी, चर्चा तसेच व्यूहरचना सुरू झाल्याचे चित्र आहे. याचाच एक भाग म्हणून येथील तालुका दौऱ्यावर आलेल्या शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख निनाद देशपांडे उपस्थित होते.

 पत्रकारांशी बोलताना  रावराणे म्हणाले, सहकारामध्ये राजकारण असू नये. सर्वसामान्यांची बॅंक म्हणून सामान्य माणसाला बॅंकेबद्दल जिव्हाळा, आपूलकी वाटली पाहिजे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी करून निवडणूकीला सामोरे जाणार आहे. यासाठी देवगड तालुक्‍यातील सहकारामधील जाणकार असलेल्या श्री. घाटे यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. भाजपचा जिल्हा बॅंक जिंकण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल. महाविकास आघाडी घट्ट असून विजय आपलाच असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्‍त केला.  


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT