कोकण

भास्कर जाधवांच्या राजीनाम्यासाठी शिवसेनेकडून विशेष विमानाची सोय

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, यासाठी शिवसेनेकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली. या विमानाने ते औरगांबादला गेले आणि विधानसभा सभापतींकडे राजीनामा दिला. यावरुन भास्कर जाधवांचा प्रवेश शिवसेनेसाठी किती महत्वाचा आहे, हे अधोरेखित झाले. 

पक्षांतर करताना नियमाप्रमाणे आधी त्यांना विधानभवनात जाऊन विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार होता. परंतु, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे औरंगाबादमध्ये होते. अध्यक्ष विधानभवनात नसतील तर त्यांच्या सचिवांकडे राजीनामा अर्ज देता येतो. तो अर्ज सचिव फॅक्‍स किंवा ई-मेलद्वारे अध्यक्ष जिथे असतील तिथे पाठवतात. त्यावर अध्यक्षांची स्वाक्षरी झाली की राजीनामा मंजूर होतो. अशी सर्वसाधारण प्रक्रिया विधानसभा सदस्यांच्या राजीनाम्याची असते. याप्रमाणे आमदार जाधव देखील अशाचप्रकारे आज राजीनाम्याची पूर्तता करणार होते. पण, हे नेतृत्व किती महत्वाचे आहे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. कारण, त्यांचा राजीनामा मंजूर होण्यास विलंब अथवा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था जाधवांसाठी केली. 

वरिष्ट नेते सोबत 
हे विमान त्यांना घेऊन औरंगाबादला रवाना झाले. त्यांच्या सोबत पर्यावरणमंत्री रामदास कदम, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अनिल परब, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आदी होते. औरंगाबाद येथे जाधव  यांनी अध्यक्षांकडे राजीनामा दिला आणि तिथेच तो मंजूर करून घेऊन त्याच विमानाने ते मुंबईला परतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT