कोकण

भास्कर जाधवांचा शिवसेना प्रवेश थांबला

सकाळवृत्तसेवा

चिपळूण -गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाला आहे. 

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जाधवांची भेट घेतली. राष्ट्रवादीकडून जाधवांची भेट  घेणारे ते पहिले नेते ठरले. पक्षात काम करण्यासाठी पुरेसा वाव दिला जात नसल्यामुळे जाधव राष्ट्रवादीत नाराज आहेत. अनेक वेळा त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली. राष्ट्रवादीत कोंडी होत असल्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. 

त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर सेना, भाजपच्या 
नेत्यांनी जाधवांची भेट घेऊन विचारपूस केली. शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र वायकर,आमदार सदानंद चव्हाण जाधवांच्या भेटीला गेले. प्रकृतीची विचारणा करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही जाधवांना फोन आला. त्यामुळे जाधव शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीची मुंबईत दोन 
दिवसापासून बैठक सुरू आहे. 

शनिवारी रायगड मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. आमदार जाधव बैठकीला गेले नाहीत, मात्र आपण लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी जिल्हाध्यक्षामार्फत कळविले. त्यामुळे एका अर्थाने  त्यांच्या सेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.  

मी पक्षाकडे लोकसभेचे तिकीट मागितले आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीतर्फे मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. मी राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या बातम्या यापूर्वीही आल्या आहेत. त्यावर मी कधीच खुलासा केला नाही. यापुढेही करणार नाही. 
- भास्कर जाधव

शिवसेनेत जाधवांचे प्रेम 
२००४ च्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून जाधवांनी शिवसेना सोडली. परंतु शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये शिवसेना नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे पक्ष सोडल्यानंतरही शिवसेनेतील जाधवांचे प्रेम कुठेही कमी झालेले नाही.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT