Big theft in Deputy Collectors home at vada palghar
Big theft in Deputy Collectors home at vada palghar 
कोकण

उपजिल्हाधिकारी यांच्या घरातून पिस्तूल दाखवून दागिने व रोकड लंपास

सकाळवृत्तसेवा

वाडा - तालुक्यातील वडवली येथे राहणारे महसूल विभागातून उपजिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले नामदेव जाधव यांच्या घरावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोकड असा एकूण 4 लाख 40 हजारांचा ऐवज लंपास केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नूसार मंगळवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास सात अज्ञात दरोडेखोरांनी नंग्या तलवारी नाचवत माजी उपजिल्हाधिकारी जाधव यांच्या घराच्या स्वयंपाकगृहाच्या खिडकीतून प्रवेश करत घरात झोपलेल्या त्यांचे भाऊ प्रकाश, आई व अन्य नातेवाईकांना पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांनी जाधव यांच्या आईकडे चाव्यांची मागणी करून घरातील पाचही कपाटांच्या चाव्या ताब्यात घेत कपाटातील 3 गंठन, 5 अंगठ्या, धनेमाळ 1, चैन, मंगळसूत्र असे सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने व 25 हजार रोकड असा सुमारे चार लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. 

वडवली गावातील भर वस्तीत असलेल्या घरात राजरोसपणे हा दरोडा पडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेसंदर्भात वाडा पोलिस ठाण्यात भादवि कलम 395 व आर्म अक्ट 3/25 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास वाडा पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे हे करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT