Biodiversity Research Rappelling Trekking Event In Kavalesad Amboli
Biodiversity Research Rappelling Trekking Event In Kavalesad Amboli  
कोकण

कावळेसादमध्ये जैव विविधता संशोधन पदभ्रमंती मोहीम 

सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यातील साहसी क्रीडा पर्यटनाचा अभिनव अध्याय सुरु करणारी कावळेसाद रॅपलिंग आणि कावळेसाद खोऱ्यातील जैव वैविधता संशोधन पदभ्रमंती ही साहसी मोहिम 26 व 27 ला आयोजित केली असल्याची घोषणा सिंधु - सह्याद्री ऍडव्हेंचरक्‍लबचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्‍वर सावंत यांनी आज येथे केली. 

याबाबत माहिती देताना श्री. सावंत म्हणाले, ""आंबोली या जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी 'कावळेसाद' हा पर्यटकांना सदैव मोहविणारा सह्याद्रीचा कातळकडा परिसर आहे. पावसाळ्यात या सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारे जलप्रपात-पाणी त्या विलोभनीय खोऱ्यातून पार शिरशिंगे गावात पोहोचते. या खोऱ्यात बहुमूल्य जैववैविधता आहे. फार क्‍वचितच कुणी मानव या खोऱ्यात केव्हातरी येतो. त्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास येथे जास्त आहे. अशा या खोऱ्यात कावळेसाद कड्यावरून पहिले अंदाजे 250 फूट खोल दरीत रॅपलिंग करीत सदस्य खाली उतरतील. तिथून थोडी उतारचाल झाल्यावर पुन्हा थोडे रॅपलिंग करतील.

हा पहिला टप्पा पार पडल्यानंतर खोऱ्यातून इथल्या पशुपक्षी, फुलपाखरे, दुर्मिळ वनस्पती, कीटक, दगड यांचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करीत करीत खोऱ्यातून पदभ्रमंतीचा अविस्मरणीय साहस - आनंद अनुभवतील. रात्रीचा मुक्काम अर्थातच निबिड जंगलात कॅम्पसाईट तयार करुन केला जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी खोऱ्यातून पुन्हा पक्षी - वनस्पती निरीक्षण करीत शिरशिंगे गाठल्यावर मोहिमेचा समारोप होईल. 

सहभागी सदस्य यांची सर्वतोपरी काळजी आणि वनविभागाच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. पदभ्रमंती मार्गात सापडून येणारा प्लास्टिक तत्सम कचरा देखील जमा करून तो आणला जाणार आहे. या मोहिमेत जैववैविधता व वनस्पती तज्ञ सुप्रसिद्ध डॉ. बाळकृष्ण गावडे, पक्षीतज्ञ डॉ. योगेश कोळी मार्गदर्शन करणार आहेत. मोहिमेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन सिंधू - सह्याद्री ऍडव्हेंचर क्‍लब या गिर्यारोहण संस्थेने केले आहे. 

प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य... 
मोहिमेचा कालावधी 26 व 27 डिसेंबर असा असला तरी सहभागी सदस्यांनी 25 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आंबोली येथे रिपोर्टिंग करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मोहीम सुरू होईल. 15 ते 50 वर्षे वयोगटाच्या स्त्री - पुरुषांना ही मोहिम खुली आहे. फक्त 40 सदस्यांनाच संधी असल्याने प्रथम येईल त्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. या माहिमेची श्रेणी मध्यम (साहसी) आहे. या मोहिमेसाठी रॅपलिंगच्या पुर्वानुभवाची आवश्‍यकता नाही. मात्र दाट जंगल भागात, डोंगरदऱ्यांतून आपले साहित्य घेऊन चालण्याइतकी शारिरीक क्षमता असावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT