bjp
bjp 
कोकण

 'सीएम' चषक स्पर्धेतून भाजप युवकांना जोडणार

सकाळवृत्तसेवा

मोखाडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'सीएम' चषक स्पर्धेचे आयोजन, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतून सुमारे 50 लाख युवकांशी जोडण्याचा संकल्प भाजपने केला आहे. या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी केले आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघात ही या स्पर्धा, जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहेत. त्याविषयी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याना आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांनी मार्गदर्शन केले आहे. 

आताची तरूण पिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकली आहे. या सर्व युवकांना भारतीय खेळांचा विसर पडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'सीएम' चषक स्पर्धेचे आयोजन संपूर्ण राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात करण्यात आले आहे. या स्पर्धेत मैदानी खेळाबरोबरच, तरूण, तरुणींच्या अंगी असलेल्या सुप्त कला, गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री विष्णु सवरा यांनी सांगितले आहे. या स्पर्धेतून भाजप राज्यातील सुमारे 50 लाख युवकांशी जोडला जाणार आहे. 

या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी केले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार, मोखाडा आणि विक्रमगडमध्ये युवा मोर्चा कार्यकर्त्याच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील स्पर्धेसाठी युवा मोर्चाचे कुणाल साळवी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीस भाजप प्रदेश कार्यकारीनी सदस्य बाबजी काठोळ, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव, चिटणीस संजोग यंदे, अंकुर राऊत, पालघर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सुशिल औसरकर, जिल्हा सरचिटणीस समीर पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT