कोकण

भाजप कार्यकर्त्यांनी चौपदरीकरणाचे काम रोखले

सकाळवृत्तसेवा

कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील हळवल फाटा ते नाईक पेट्रोल पंपापर्यंत भागातील काम आज भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. या भागातून जोपर्यंत गटार लाईन होत नाही तोवर काम करू न देण्याचा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला आहे. चौपदरीकरणाच्या या कामामुळे येथील घरे आणि भातशेतीमध्येही पाणी जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

शहरालगतच्या गडनदीपूल ते ओसरगाव हद्दीपर्यंत चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यात येत्या दोन दिवसांत नाईक पेट्रोल पंप ते गडनदी पुलापर्यंत क्रॉंक्रिटची मार्गिका टाकण्यासाठी मातीचा भराव टाकण्यात आला. यामध्ये पूर्वीची पाणी वाहून जाणारी लाइन ठेकेदाराने माती टाकून बुजवली. त्यानंतर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नवीन पाईप लाइन टाकण्यास ठेकेदाराने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांसह भाजप महिला आघाडीच्या प्रज्ञा ढवण, गीतांजली कामत, साक्षी वाळके, वैजयंती कांबळी, शमा कामत, स्नेहा अंधारी, माधुरी मयेकर यांच्यासह सृजन कामत, विलास गावकर, पप्पू पुजारे, अभय घाडीगावकर, उमेश घाडीगावकर आदींनी दुपारी बारा वाजता चौपदरीकरणाचे काम बंद पाडले.

चौपदरीकरणाचे काम रोखल्यानंतर दिलीप बिल्डकॉनचे साईट सुपरवायजर समरसिंग तेथे आले. यावेळी मात्र त्यांची उडवाउडवीची उत्तरे दिल्याने भाजप महिला कार्यकर्त्यांनी भरावासाठी आलेल्या डंपर, जेसीबी आणि पाणी टॅंकरच्या चाव्या काढून घेतल्या. जोपर्यंत पाईप लाइनचे काम सुरू करत नाही. तोपर्यंत वाहने देखील जाग्यावरून हलवू देणार नाही असा पवित्रा भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी घेतला. 

अखेर समरसिंग यांनी यांनी दिलीप बिल्डकॉनचे संपर्क अधिकारी रवीकुमार यांना याबाबतची माहिती दिली. तसेच महामार्ग उपअभियंता श्री..शेडेकर यांनाही या आंदोलनाबाबत कळविण्यात आले. त्यानंतर उद्या (ता.14) वागदे ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन हळवल फाटा ते नाईक पेट्रोल पंपापर्यंत नवीन पाइपलाइन टाकण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे आंदोलन थांबविण्यात आले. मात्र जोपर्यंत पाईप लाइनचा प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचेही दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. 

""महामार्गाचे काम करताना पावसाळी पाणी वाहून जाणारे मार्ग बंद केल्याचा फटका स्थानिक नागरिकांसह भातशेतीला बसणार आहे. एवढेच नव्हे तर पुढील काळात या सर्वांचा जाब नागरिक सत्ताधारी म्हणून आम्हालाच विचारणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराचा मनमानीपणा आम्ही चालू देणार नाही. जोपर्यंत गटारलाइनबाबत लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरू होऊ देणार नाही.''
- प्रज्ञा ढवण,
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य 

""चौपदरीकरणात 30 ते 50 फूट उंचीचे भराव टाकण्यात आले. तर या भरावापासून वाडीत जाण्यासाठी तीव्र उताराचा रस्ता तयार करून देण्यात आला आहे. हा रस्ता चढ-उतार करताना अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यात नागरिक देखील जायबंदी होत आहेत.''
- गीतांजली कामत,
तालुकाध्यक्षा, कणकवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT