BJP's agitation to open temple konkan sindhudurg
BJP's agitation to open temple konkan sindhudurg 
कोकण

"दार उघड उद्धवा, दार उघड'! भाजपचे घंटानाद आंदोलन, वाचा सविस्तर... 

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - "दार उघड उद्धवा, दार उघड, मदिरा चालू, मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद, दारु नको, दार उघड, भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, उद्धव सरकार झाले फेल,' अशा घोषणा देत आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभर आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरू करण्यासाठी केंद्राने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नसल्याने आंदोलन करण्यात आले. 

भाविक, जनता, धार्मिक-अध्यात्मिक संस्था, संघटना, देवस्थानचे मानकरी, विविध सांप्रदायाचे मान्यवरांच्या सहकार्याने येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्‍वर मंदिरासमोरही आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, श्री रामेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे रविंद्र परब, विष्णू परब, जगदीश परब, बाळा परब, नितेश परब, स्वप्निल परब, मंगेश परब, प्रसाद परब, मानकरी सुनिल परब, शिवराम परब, देवस्थान पूजारी विजय गुरव यांच्यासह भाजपचे समिर चिंदरकर, राहुल मोर्डेकर, निलय नाईक, भगवान नाईक, आनंद गावडे, बाळकृष्ण मयेकर, ओंकार चव्हाण, शरद मेस्त्री, विनोद लोणे, शेखर काणेकर, निखिल घोटगे, नगरसेवक नागेश गावडे, धर्मराज कांबळी, प्रशांत आपटे, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र वगळता देशभरात सर्व मंदिरे दर्शनासाठी उघडली आहेत; परंतु आघाडी सरकार जाणिवपूर्वक जनतेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. राज्यातील जनतेची श्रद्धास्थाने असलेली सर्व मंदिर कोविड नियमावलीच्या अटी शर्थीसह त्वरित खुली करण्यासाठीची मागणी राज्य सरकारपर्यंत पोहचवावी. 

अन्य मंदिरांसमोरही आंदोलन 
वेंगुर्ले शहराबरोबरच तुळस, म्हापण, वायंगणी, रेडी येथीलही ग्रामदेवतेच्या मंदिरांसमोर ठाकरे सरकारच्या विरोधात घंटनाद करण्यात आला. यावेळी त्या-त्या मंदिरांचे मानकरी, पूजारी, भाविक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामदेवतेच्या बंद मंदिराबाहेर घंटानाद झाल्यानंतर येथील तहसिलदार यांना निवदेन देण्यात आले. तहसीलदार कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या प्रतिनिधी यांनी निवेदन स्वीकारले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT