case was registered against 5 persons kokan marathi news
case was registered against 5 persons kokan marathi news 
कोकण

Sakal Impact : अखेर त्या 5 जणांविरोधात झाला गुन्हा दाखल....

सकाळ वृत्तसेवा

दापोली (रत्नागिरी) : लॉकडाऊन सुरू असतानाही चिरेखाण सुरू ठेऊन चिऱ्याचे उत्खनन केल्या प्रकरणी तब्बल 19 दिवसानंतर टाळसुरे गावचे तलाठी अलिमिया सय्यद यांनी चिरेखाण मालक व 4 मजुरांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोलीचे मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी 2 एप्रिल रोजी  सकाळी 10 वाजणेचे सुमारास टाळसुरे येथील स्वप्नील प्रभाकर जाधव यांचे चिराखाणीवर जाऊन पाहणी केली असता त्यांना चार कामगार कटर मशीन व पॉवर टिलर चालवत होते. शासकीय अधिकाऱ्यांना पाहून ते पळून गेले. या खाणीवरील झोपड्यांजवळ 3 हजार चिरे आढळून आले. खानविलकर यांनी यासंदर्भात आपला अहवाल सादर केल्यावर तहसीलदार दापोली यांनी टाळसुरेचे तलाठी सय्यद याना चिरेखाण मालकाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे लेखी आदेश 2 एप्रिल रोजीच दिले होते.

 तरीही तलाठी टाळसुरे यांनी 15 दिवस होऊन गेले तरी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती, यामुळे प्रसारमाध्यमात वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठांच्या आदेशाने काल (ता. 21) रोजी सायंकाळी टाळसुरेचे तलाठी सय्यद यांनी चिरेखाण मालक स्वप्नील जाधव व चार कामगार यांचे विरोधात मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भादवी 188 व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल  करण्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH : हैदराबादनं टॉस जिंकला अन् श्रेयस हसला; अहमदाबादमध्ये कमिन्स 'असा' हरला

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

Pune Porsche Accident : पब चालविणे गंमत आहे का? पुणे पोर्शे अपघातप्रकरणी न्यायालयाचे आरोपींना खडेबोल

Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT