कोकण

कातळशिल्पांची वेबसाईट बनवा - मुख्य सचिव जैन

शिरीष दामले

रत्नागिरी - कातळशिल्पांची सांगोपांग माहिती देणारी वेबसाईट तयार करा, कातळशिल्पांसाठी सरकारी पातळीवर विविध खात्यांकडून जे सहकार्य हवे ते देण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न केला जाईल. पुरातत्त्व खाते याबाबत जे काम करीत आहे, त्याला शासकीय यंत्रणेने संपूर्ण करा अशा आदेशवजा सूचना राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी दिले.

रत्नागिरी येथील दौर्‍यात कातळशिल्पांबाबत त्यांनी उत्सुकता दाखवली. त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सुधीर रिसबूड व ऋत्विज आपटे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व प्रांत अमित शेडगे तसेच सीईओ आंचल गोयल हजर होते. जिल्हाधिकारी व प्रांत यांनीही त्यांना सरकारी स्तरावर येणार्‍या अडथळ्यांची माहिती दिली. कातळशिल्पांची कालगणना नेमकी कोणती, पर्यटनाचे स्थान काय, त्याचे क्षेत्र किती आहे, ती ज्या जागेत आहेत, त्याचे उत्पन्न किती अशी माहिती त्यांनी विचारली. कशेळी येथील कातळचित्राबाबत माहिती ऐकून ते अवाक झाले. पर्यटनाच्या दृष्टीने त्यासाठी सर्किट तयार करा, असेही त्यांनी सुचवले.

श्री. शेडगे यांनी कातळशिल्प असलेली जागा नोटिफाय करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे कातळशिल्पांचा विकास करण्यात व त्यांना अर्थसाह्य देण्यात मार्ग मोकळा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. यासाठी शासन यंत्रणेत पाठपुरावा करण्याची ग्वाही जैन यांनी दिली. कातळशिल्प विकासाकरिता उक्षी येथील मॉडेल बनवण्यात आले आहे. त्यामध्ये जागामालकाला सहभागी करून घेण्यात आले आहे. जागा ताब्यात न घेता त्याचा विकास ही संकल्पना उत्तम असल्याचे जैन यांनी सांगितले.

राज्याचे मुख्य सचिवपदी असलेल्या अधिकार्‍यांनी कातळशिल्पात दाखवलेला रस आणि त्यासाठी सरकारी यंत्रणेचे देऊ केलेले साह्य हे आमचा तसेच जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेचा हुरूप वाढवणारे आहे. जैन यांनी व्यक्तिगत रस घेऊन माहिती घेतली हे महत्त्वाचे आहे.

- सुधीर रिसबूड, कातळशिल्प शोधकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT