कोकण

कंत्राटी कामगारांनी बीएसएनएलच्या कार्यालयास टाळे ठोकले

सकाळवृत्तसेवा

मालवण - येथील बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचा 2017 पासूनचा पगार संबंधित ठेकेदाराने न दिल्याने संतप्त कामगारांनी आज कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली येथील कार्यालयावर धडक देत अधिकार्‍यांना जाब विचारला. अधिकार्‍यांकडून सकारात्मक उत्तरे न मिळाल्याने अखेर अधिकार्‍यांच्याच हस्ते कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. 

दरम्यान कंत्राटी कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यास स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. कामगारांच्या गंभीर प्रश्‍नाकडे आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी काळोखात जाणार आहे. त्यामुळे या तिन्ही लोकप्रतिनिधींचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. 

खासदार विनायक राऊत बीएसएनएल मनोर्‍यांची केवळ उद्घाटन करत सुटले आहेत. कामगारांच्या आठ महिन्याच्या पगाराचे काय? ठेकेदाराने गणेशोत्सवापूर्वी कामगारांचे पगार देऊ असे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यावरील कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

-  अशोक सावंत

कंत्राटी कर्मचार्‍यांच्या थकीत पगाराच्या समस्येसंदर्भात आज कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. सावंत यांनी कंत्राटी कर्मचारी बाळू राणे, बाळू मेस्त्री, प्रशांत सावंत, राजा सावंत, सुबोध केळुसकर, अमित मोरे, रूपेश चव्हाण, गणेश माधव, नारायण केळुसकर, प्रियांका वीर, श्याम घाडीगावकर, महेश गावडे या कामगारांसह येथील बीएसएनएलच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपस्थित अधिकारी एस. बी. कसबे, संजय राजोपाध्ये, श्री. पगारे या अधिकार्‍यांना धारेवर धरत जाब विचारण्यात आला.

कंत्राटी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी कर्ज काढावी लागत आहेत. त्यामुळे जोपर्यंत कामगारांच्या पगाराचा प्रश्‍न निकाली काढला जात नाही तोपर्यंत कार्यालयातून जाणार नाही असे स्पष्ट केले. 

बीएसएनएल अधिकार्‍यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून कंत्राटी कामगारांच्या प्रश्‍नासंदर्भात लक्ष वेधले. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न आल्याने कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. त्यानुसार सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना कार्यालयाबाहेर काढत अधिकार्‍यांच्याच हस्ते कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. अधिकार्‍यांनी सावंतवाडी जात कामगारांच्या पगाराचा प्रश्‍न निकाली काढावा अन्यथा यापुढील आंदोलन आणखी तीव्र असेल असा इशारा श्री. सावंत यांनी दिला.

यावेळी बीएसएनएल अधिकार्‍यांनी कंत्राटी कामगारांना पगार हा मिळायलाच हवा. मात्र ते आमच्या हातात नाही. संबंधित ठेकेदार, अधिकारी यांच्यामुळेच कंत्राटी कामगार पगारापासून वंचित असल्याची कबुली या अधिकार्‍यांनी यावेळी दिली. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: फायर फायटर डे का साजरा केला जातो? जाणून घ्या सोप्या शब्दात महत्त्व

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

SCROLL FOR NEXT