corona lab workers strike konkan sindhudurg
corona lab workers strike konkan sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात कोरोना लॅबचे कर्मचारी संपावर 

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे निदान होणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील रेंवीय निदान तथा कोरोना प्रयोगशाळेतील 13 कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मानधन जमा होत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत डॉक्‍टर व जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे शासनाने त्यांना कोरोना योद्धा असे संबोधले; मात्र या कठीण काळात सेवा देणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेमधील शिपाई व परिचर यांना तब्बल चार महिने मानधन मिळालेले नाही.

नाशिक येथील एका ठेकेदाराने या कर्मचाऱ्यांचे ऑक्‍टोबर ते जानेवारीपर्यंतचे मानधन त्यांच्या खात्यात जमा केलेले नाही. या अन्यायाविरोधात स्वप्नील बिरमोळे, पंकज परब, रेखा घंटा, नामदेव मेस्त्री, सचिन परब, गौरेश मर्टल, विठ्ठल सावंत, एकनाथ मर्टल, अजय खरात, सदाशिव परब, प्रसाद मर्टल, वैभव हुंबरमळेकर यांनी प्रयोगशाळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना 24 फेब्रुवारीला निवेदन देऊन तसा इशारा दिला होता; मात्र त्या मागणीची पूर्तता न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी आजपासून मानधन जमा होइपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे. 

शासनाने कंपनीला पैसे दिले नाहीत 
कर्मचारी थकीत मानधन तत्काळ मिळावे, यासाठी संबंधित नाशिक येथील कंपनीला तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे. मानधन देण्याची मागणी केली आहे; परंतु शासनाने आपल्याला मानधन रक्कम दिली नसल्याने आम्ही कर्मचारी मानधन देवू शकत नसल्याचे कंपनीने कळविले आहे. तरी कोरोना चाचणी थांबणार नाही. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT