Corona Patient Death In Rajapur Ratnagiri Marathi News
Corona Patient Death In Rajapur Ratnagiri Marathi News  
कोकण

राजापूर तालुक्यात मृत वृद्धेचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील आंबोळगड नार्वेकरवाडी येथील एका 83 वर्षीय वयोवृध्द महिलेचा जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू होण्याची तालुक्‍यातील पहिलीच घटना आहे. 

दरम्यान, या महिलेच्या संपर्कात आलेल्या तीच्या तिन्ही नातेवाईकांनाही तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर या महिलेवर कोरोना - 19 नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली आहे. संबंधित महिला आपल्या कुटुंबीयांसह 19 मे रोजी मुंबईतुन आपल्या गावी आंबोळगड नार्वेकरवाडी येथे आली होती.

त्यानंतर त्यांना आरोग्य विभागाकडे होम क्वारंटाईन केले होते. मात्र गेले दोन ते तीन दिवस या महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. स्थानिक पातळीवर तीची वैद्यकिय तपासणी करून तिला अधिक उपचारासाठी बुधवारी 3 जून रोजी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तीचा स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आला होता. मात्र जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतानाच या महिलेचा मृत्यू झाला. 

या महिलेच्या मृत्यूची व तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळताच तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तिच्या संपर्कात आलेल्या तीचा मुलगा, सुन व अन्य नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

या महिलेचा मृत्यू झाला असून तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तीच्यावर कोवीड-19 प्रमाणे अत्यंविधी केले जाणार असल्याची माहिती खाडे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे ही कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : गुजरातमध्ये भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रता

SCROLL FOR NEXT