Corona Patient Found In Kankavali City System Alert Sindhudurg Marathi News
Corona Patient Found In Kankavali City System Alert Sindhudurg Marathi News  
कोकण

कोरोना रुण सापडल्याने `या` शहरात यंत्रणा सतर्क 

सकाळवृत्तसेवा

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - शहर आणि लगतच्या भागात कोरोना रुग्ण आढळल्याने कणकवली नगरपंचायत प्रशासन, तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याअनुषंगाने आज नगराध्यक्ष दालनात नगरसेवकांची बैठक झाली. यात मुंबई तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्‍तींची माहिती तातडीने नगरपंचायत किंवा आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. 

शहरालगतच्या एका संस्थेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यात वरचीवाडी कणकवलीमधील एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शहरालगतच्या कलमठ येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यासह त्याच्या सर्व कुटुंबीयांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली होती. या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तींचे कणकवली शहरासह लगतच्या गावातही येणे-जाणे असल्याने समूह संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर कणकवली शहरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले. 

नगराध्यक्ष दालनात झालेल्या बैठकीला कणकवली तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी आर. जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, बांधकाम सभापती संजय कामतेकर, आरोग्य सभापती प्रतीक्षा सावंत, नगरसेवक अभी मुसळे, शिशिर परुळेकर, ऍड. विराज भोसले, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, मेधा सावंत, मानसी मुंज, उर्मी जाधव, माजी नगरसेवक बंडू गांगण, किशोर राणे, आरोग्य कर्मचारी मनोज धुमाळे, ध्वजा उचले आदी उपस्थित होते. 

कलमठ गावातील "त्या' कुटुंबातील चारही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच, या व्यक्‍तींच्या अतिसंपर्कात 25 व्यक्‍ती आहेत. या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. कोरोना समूह संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्‍तींमध्ये कोरोनाची लक्षणे असतील, तर त्यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, त्यांची स्वॅब टेस्ट घेतली जाईल. 
- डॉ. संजय पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी 


कोरोनापासून कणकवली शहर सुरक्षित ठेवायचे असेल, तर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीची नोंद ठेवून ती व्यक्‍ती क्वारंटाईन व्हायला हवी. त्या अनुषंगाने स्थानिक नगरसेवकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागात परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीची माहिती घ्यावी आणि त्यांना क्‍वारंटाईन करावे. 
- समीर नलावडे, नगराध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT