Corona Positive Patient Found In Devrukh Sindhudurg Marathi News
Corona Positive Patient Found In Devrukh Sindhudurg Marathi News  
कोकण

देवरुखात सापडला कोरोना पॉझिटिव्ह ! 

सकाळवृत्तसेवा

देवरूख ( रत्नागिरी) - गेले दीड महिना संगमेश्वर तालुक्‍यातील विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असताना देवरुखात मात्र एकही सापडला नव्हता. साडवली येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करताना आरोग्य विभागातीलच एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने देवरुखात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, गुरुवारी सकाळी संगमेश्‍वर तालुक्‍यात 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आता संगमेश्‍वर तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 91 वर गेली आहे. देवरूखप्रमाणेच आज नजीकच्या पूर गावात एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. आजपर्यंत ज्या सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, ते सगळे मुंबईतून गावी आले होते. मात्र, आजचा देवरुखातील पॉझिटिव्ह हा स्थानिकच असल्याने शहरात खळबळ उडाली. संबंधित व्यक्ती आरोग्य विभागातील कर्मचारी असून तो साडवली कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करत होता. या ठिकाणीच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले.

पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर तत्काळ तहसीलदार, आरोग्य विभागाने हा कर्मचारी राहत असलेल्या शहरातील दत्तनगर परिसर सील केला आहे. मुख्य रस्त्याजवळच दत्तनगरकडे जाणारा मार्ग बंद केला असून या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या परिसरातून बाहेर येण्यास वा आत जाण्यास मज्जाव केला आहे. या कर्मचाऱ्याच्या व्यक्तीच्या संपर्कात कोण, कोण आले होते, त्याचा शोध सुरू असून तेवढ्यांना तातडीने क्वारंटाईन केले जातेय.

कोरोना रुग्णांच्या बाबतीत तालुका शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मंगळवारपर्यंत 89 असलेली रुग्णसंख्या आता 91 झाली असून यातील 20 पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले तर साडवलीतील कोविड सेंटरमध्ये 32 जणांवर उपचार सुरू असून उर्वरित रुग्ण जिल्हा कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. 

पहिला बळी वाशीतर्फे देवरुखातील.. 
कोरोनाने तालुक्‍यात पहिला बळी वाशीतर्फे देवरुखातील व्यक्तीचा झाला होता. त्यानंतर कोसुंब गावात मुंबईतून आलेली एक महिला मृत्यूमुखी पडली. तिचा रिपोर्ट नंतर पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बुधवारी तालुक्‍यातील बेलारी येथील एका 85 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तालुक्‍यातील बळींची संख्या 3 वर गेली आहे. दोन दिवसांपूर्वीच संगमेश्‍वर आयटीआय येथील कोविड सेंटर साडवली येथे स्थलांतरित केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT