coronavirus impact devgad taluka konkan sindhudurg
coronavirus impact devgad taluka konkan sindhudurg 
कोकण

कोरोनाग्रस्त रुग्णामुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये असताना मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. संबधित महिलेच्या संपर्कात सुमारे 15 जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेच्या प्राथमिक तपासणीत समोर येत असल्याचे सभापती सुनील पारकर यांनी पत्रकारांना सांगितले. प्रशासनाकडून खबरदारीची उपाययोजना सुरू झाली असल्याचे तसेच विलगीकरण कक्षातील अन्य व्यक्‍तींकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील कालवी येथील मृत्यू झालेली वृद्ध महिला सुरूवातीला गावातील शाळेत संस्थात्मक अलगीकरणात होती; मात्र अलगीकरणात राहिल्यानंतर मोजक्‍याच दिवसात तिला उपचारासाठी ओरोस येथे पाठवण्यात आले होते. तेथेच तिचा मृत्यू झाला; मात्र तपासणीसाठी पाठवण्यात आलेला तिचा स्वॅबचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणेने पुढील कार्यवाहीला सुरूवात केली आहे. तिच्या अति संपर्कात आलेल्या तसेच तिच्या अंत्यविधीवेळी संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू असून सुमारे 15 जण संपर्कात असल्याची प्राथमिक चौकशीत माहिती समोर येत आहे.

कालवीमध्ये अलगीकरणात असताना तिला त्रास जाणवू लागल्यावर तिचा प्रवास कोणत्या वाहनातून डॉक्‍टरांपर्यंत झाला. ओरोसला जाण्यापूर्वी येथील स्थानिक कोणत्या डॉक्‍टरांकडे ती गेली होती का? याचीही चाचपणी सुरू असल्याची माहिती सभापती पारकर यांनी दिली. याबाबत श्री. पारकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. दरम्यान, संस्थात्मक अलगीकरणात असलेली आणखी एक महिला पॉझिटिव्ह सापडली असून तिच्या अतिसंपर्कात 24 जण तर कमी संपर्कात असलेले 23 असे एकूण 47 जण संपर्कात आल्याची माहिती डॉ. संतोष कोंडके यांनी दिली. 

"त्या' सर्वांचे स्वॅब घेणार 
कालवी येथील मृत्यू झालेल्या वृद्धेच्या संपर्कात आलेल्या 15 जणांमध्ये दोन रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे. या सर्वांना आता घरगुती अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून सर्वांचे स्वॅब घेणार असल्याची माहिती डॉ. संतोष कोंडके यांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT