coronavirus impact konkan sindhudurg
coronavirus impact konkan sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी 10 रुग्ण 

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नवीन 10 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. 7 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 172 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील 5 रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 6 हजार 490 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. यातील 6 हजार 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 174 रुग्णांचे निधन झाले आहे. परिणामी 172 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. यातील 6 रुग्ण जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेत आहेत. उर्वरित 166 रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 

172 रूग्ण सक्रिय असून त्यापैकी 5 रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. यातील चार रुग्ण ऑक्‍सीजनवर तर एक रुग्ण व्हेन्टिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेर जाऊन सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर. टेस्टमध्ये 36 हजार 649 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 481 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 129 नमुने घेण्यात आले. ऍन्टिजेन टेस्टमध्ये एकूण 26 हजार 487 नमुने तपासले. पैकी 2 हजार 125 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 100 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 63 हजार 136 नमुने तपासण्यात आले. 

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 450 (11), दोडामार्ग 363 (5), कणकवली 1989 (45), कुडाळ 1458 (33), मालवण 599 (18), सावंतवाडी 853 (43), वैभववाडी 189 (8), वेंगुर्ले 561, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 28 (1). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण ः देवगड - 11, दोडामार्ग - 8, कणकवली - 44, कुडाळ - 36, मालवण - 27, सावंतवाडी -21, वैभववाडी - 6, वेंगुर्ले - 9 व जिल्ह्याबाहेरील 10. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT