crime case in malvan sindhudurg
crime case in malvan sindhudurg 
कोकण

पोलिस कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला : पोलिस कर्मचारी व संशयित आरोपी यांच्यात झाली झटापट अन्....

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : तक्रारी अर्जावरील चौकशीस गेलेल्या येथील पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला झाला. या प्रकारानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या सहायक पोलिस निरीक्षकांसह सहा ते सात पोलिस कर्मचारी व संशयित आरोपी यांच्यात झटापट झाली. यात पोलिस कर्मचारीही जखमी झाले. दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान वायरी लुडबेवाडा कुलस्वामीनी भवानी मंदिरानजीक ही घटना घडली. संशयितांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले. जखमी पोलिसांसह संशयित दोन आरोपींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. 


याबाबतची माहिती अशी-

वायरी लुडबेवाडीतील तक्रारदाराने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी पोलिस ठाण्याचे कर्मचारी विलास टेंबुलकर व धोंडू जानकर हे दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान वायरी येथे गेले होते. यावेळी तक्रारदाराच्या शेजारी राहणार्‍या मोहन लुडबे याने शिगेने पोलिस कर्मचारी जानकर यांच्या डोक्यावर वार केला. यात जानकर गंभीर जखमी झाले. पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती टेंबुलकर यांनी पोलिस ठाण्यास देताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, आशिष कदम, माही महाडिक, सिद्धेश चिपकर, मंगेश माने, दिलीप खोत, हरिश्‍चंद्र जायभाय तसेच गृहरक्षक दलाचे जवान पेंडूरकर तसेच अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 


पोलिसांना पाहताच संशयित आरोपी मोहन लुडबे, विवेक लुडबे यांनी या पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत सिद्धेश चिपकर, मंगेश माने, दिलीप खोत यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी जखमी झाले. या संशयित आरोपींची वृद्ध आईही लाकडी ओंडका घेत पोलिसांच्या अंगावर धावून गेली. अखेर संशयित आरोपी मोहन याला दोरीच्या साहाय्याने बांधण्यात आले. यात जखमी झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांसह संशयित आरोपींना येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमी झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांची भेट घेत माहिती घेतली.

पोलिसांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. दैवबलवत्तर म्हणून सहायक पोलिस निरीक्षक बचावलेपोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण अन्य पोलिस कर्मचार्‍यांसह वायरी येथे दाखल झाले. याच दरम्यान संशयित आरोपी मोहन लुडबे याने त्यांच्यात लोखंडी शिग घुसविण्यासाठी धाव घेतली. याचवेळी पोलिस कर्मचारी सिद्धेश चिपकर याने ही शिग धरल्याने श्री. चव्हाण हे बचावले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. यावेळी झालेल्या झटापटीत चिपकर याच्या छातीस दुखापत झाली. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT