बांदा (सिंधुदुर्ग) : स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या जत्रोत्सवातील जुगारावर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे मोठी कारवाई केली. दाभिल (ता. सावंतवाडी) गावात जत्रोत्सवाच्या रात्री जंगलात जुगार खेळणाऱ्या तब्बल ९ जणांना ताब्यात घेऊन बांदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील काही जण काळोखाचा फायदा घेत पळून गेले. या कारवाईत ८२ हजार ८०० रुपयांच्या रोकडसह ४ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
दाभील जत्रोत्सवात अनधिकृत जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्राप्त झाली होती. या पथकाने पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून कारवाई केली.
जुगार खेळताना विद्याधर महादेव घाडी (दाभिल), सुरेश तानाजी दळवी (विलवडे), सुधाकर दत्ताराम गाड (उगाडे), संजय कृष्णा गावडे (सरमळे), प्रकाश जगन्नाथ दळवी (विलवडे), राजेश वामन सावंत (वाफोली), सिद्धेश चंद्रकांत कुडव (इन्सुली), कृष्णा न्हानू घाडी (दाभील) व विजय श्रीधर परब (भालावल) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच घटनास्थळावरुन वॅगनर कार, पल्सर मोटरसायकल, अॅक्टिव्हा गाडी जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ८२ हजार ८०० रुपयांच्या रोकडसह एकूण ४ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. शेळके, सहाय्यक पोलीस फौजदार आर. बी. शेळके, पोलीस हवालदार एस. वाय. सावंत, जी. बी. कोयंडे, पोलीस नाईक पी. एस. कदम, ए. एस. धुरी, के. ए. केसरकर, पी. पी. वालावलकर, पोलीस काँस्टेबल आर. एस. इंगळे, पी. पी. गावडे, सी. एस. नार्वेकर, डी. ए. कांदळगावकर यांच्या पथकाने केली. याबाबत एलसीबीचे प्रमोद काळसेकर यांनी बांदा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
'सकाळ'चे वृत्त खरे ठरले
जत्रोत्सवातील रात्रीच्या खेळाबाबत दैनिक 'सकाळ'ने २६ डिसेंबरच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावेळी बांदा पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित नसलेल्यांचे जबाब नोंदवत जत्रोत्सवात जुगार सुरू नसल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांना सादर केला होता. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने दाभील या दुर्गम गावात सुरू असलेल्या जत्रोत्सवातील जुगारांवर कारवाई केल्याने 'सकाळ'चे वृत्त खरे ठरले आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.