Crocodile Attack Cow esakal
कोकण

Dapoli News : बौद्ध लेण्‍यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्हाळेकाजीत मगरीचा गायीवर हल्ला; पायाचे तोडले लचके अन्..

Crocodile Attack Cow : संध्याकाळच्या सुमारास नदीकाठी चरत असलेली जनार्दन सहदेव जाधव यांची गाय नदीच्या काठावर पाणी पिण्यास गेली.

सकाळ डिजिटल टीम

गायीला बाहेर काढल्यावर तिचा एक पाय मगरीने तोडल्याचे दिसले तसेच मानेखाली मोठ्या प्रमाणत रक्त येत आहे हे लक्षात आले. ही घटना वन विभागाला कळवण्यात आली.

गावतळे : दापोली तालुक्यातील बौद्ध लेण्‍यांसाठी (Buddhist Caves) प्रसिद्ध असलेल्या पन्हाळेकाजी या गावातील कोडजाई नदीकाठी चरणाऱ्या गायीवर (Cow) मगरीने हल्ला चढवला. गायीच्या पायाचे लचके तोडल्यामुळे एक पाय तुटला आहे. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. हा प्रकार मंगळवारी (ता. ८) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

कोडजाई नदी (Kodjai River) किनारी मंगळवारी होळेश्वरवाडी तेथील पाणवठ्याजवळ गावातील गुरे चरत होती. संध्याकाळच्या सुमारास नदीकाठी चरत असलेली जनार्दन सहदेव जाधव यांची गाय नदीच्या काठावर पाणी पिण्यास गेली. त्याचवेळी अचानक एका मोठ्या मगरीने गायीला पाण्यात खेचून घेतले. एक पाय व मानेखालील भागात चावे घेतले. हा प्रकार समजताच तिथे जवळच असलेल्या प्रणील जनार्दन जाधव यांनी मोठमोठ्या दगडी उचलून मगरीवर फेकल्या. त्यामुळे गायीला सोडून मगर पळून गेली.

गायीला बाहेर काढल्यावर तिचा एक पाय मगरीने तोडल्याचे दिसले तसेच मानेखाली मोठ्या प्रमाणत रक्त येत आहे हे लक्षात आले. ही घटना वन विभागाला कळवण्यात आली. वन विभागाचे वनपाल खोत यांनी जखमी झालेल्या गायीची पाहणी केली. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे खासगी अधिकाऱ्यांना बोलावून उपचार केले.

गेले तीन वर्षे वन विभागाकडे पत्रव्यवहार करीत आहोत; पण मगरींविषयी ठोस उपाय केलेले नाहीत. आतापर्यंत बारांहून अधिक कुत्री मगरींनी भक्ष्य बनवले आहेत. अनेक गुरे जखमी झालेली आहेत. दोन ग्रामस्थांवरही हल्ला केला आहे. त्यामुळे या मगरींना येथून दूर सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. कोडजाई नदी स्थानिकांसाठी रोजगाराचे साधन होती. आठ महिने भाजी पीक घेणे आणि चार महिने शेती यावर येथील लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. आता महिला नदीवर कपडे धुण्यासाठी जाण्यासही घाबरतात. भाजी पीक घेणे बंद झाले आहे.

-राजेंद्र जाधव, ग्रामस्थ, पन्हाळेकाजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT