the damage of crop compensation is half for farm in ratnagiri the waiting for second installment in ratnagiri 
कोकण

शेतकऱ्यांचे नुकसान जास्त आणि भरपाई मात्र अर्धीच

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्‍यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीपोटी केंद्र व राज्य सरकारकडून नुकसानापैकी ६२ लाख ५८ हजारांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून येथील तहसील कार्यालयामार्फत त्याचे वाटप केले जात आहे. एकूण नुकसानापैकी अर्धीच रक्कम प्राप्त झाल्याने शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

या वर्षीही लांबलेल्या परतीच्या पावसाने तालुक्‍यातील भातशेती आडवी केली. याबरोबरच नाचणी पिकाचेही मोठे नुकसान झाले. या पावसात तब्बल ७ हजार ४५९ शेतकऱ्यांचे १ हजार ३३६. ७१ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर ओढावलेल्या वाईट परिस्थितीची राज्य शासनाने दखल घेऊन महसूल, कृषी विभाग व पंचायत समिती प्रशासन यांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित यंत्रणेने ते पंचनामे केले. त्याचा अहवाल येथील तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. शासकीय मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. 

आतापर्यंत ५७ लाखांचे वाटप

केंद्र सरकारने या नुकसानीपोटी ४२ लाख ५८ हजार रुपयांची तर राज्य सरकारने २० लाख रुपयांची अशी एकूण ६२ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम येथील तहसील कार्यालयाला प्राप्त झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ५७ लाख ५ हजार ९६५ रुपयांच्या मदतीचे वाटप केले आहे, अशी माहिती नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Update : देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT