Demand to open Vijaydurg fort
Demand to open Vijaydurg fort 
कोकण

पर्यटकांसाठी विजयदुर्ग खुला करा ः चौगुले

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) - लॉकडाउननंतर स्थानिक पर्यटन बहरून व्यवसायाला चालना मिळण्यासाठी तालुक्‍यातील ऐतिहासिक ठिकाण असलेले किल्ले विजयदुर्ग पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी तालुक्‍यातील गिर्ये येथील सामाजिक कार्यकर्ते दिलदार चौगुले यांनी केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले. 

किल्ले विजयदुर्ग पर्यटकांसाठी खुला केल्यास अनेकांच्या हाताला काम मिळेल. यातून स्थानिक व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होईल. सध्या दीपावली सुटी असल्याने पर्यटन हंगामाला चालना मिळण्यासाठी किल्ला खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
निवेदनात म्हटले आहे, की विजयदुर्ग गावाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. वर्षभरात अनेक पर्यटक किल्ले विजयदुर्गला भेटी देतात; मात्र लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर किल्ला बंद असल्याने भेटी देणाऱ्या पर्यटकांची निराशा होते. किल्ला सुरू करण्याची विजयदुर्गमधील सादीक धोपावकर, संतोष बांदिवडेकर, दामाजी पाटील यांचीही मागणी आहे. त्यामुळे किल्ला सुरू करण्याची आवश्‍यकता श्री. चौगुले यांनी व्यक्‍त केली आहे. 

...तर पर्यटनवृद्धी शक्‍य 
जिल्ह्यातील मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग पर्यटकांसाठी खुला केल्याने दीवाळी सुटी निमित्ताने पर्यटकांची वर्दळ वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे किल्ले सिंधुदुर्गप्रमाणे किल्ले विजयदुर्ग सुरू करावा. गावातील अनेकांचे व्यवसाय किल्ले विजयदुर्गच्या पर्यटनावर अवलंबून आहेत. किल्ला प्रवेश खुला होत नसल्याने व्यावसायाला चालना मिळणे कठीण आहे. त्यामुळे याबाबत वेळीच निर्णय घेण्याची गरज आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT