कोकण

कसालमध्ये रस्ता क्रॉसिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोरदार सुरू असून न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. तरी विद्यार्थी संख्या व त्यांची भविष्यात उद्‌भवणारी समस्या लक्षात घेता तेथे सर्व्हीस रोड व रस्ता क्रॉसिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अन्यथा उद्या (ता.6) रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे; मात्र कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना भविष्यात रस्ता ओलांडून शाळेत जाण्याची सोय काय, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणाचे काम करताना विद्यार्थ्याचा विचार होण्याची गरज आहे. नपेक्षा तेथे अपघात घडण्याची भिती व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. भविष्यात गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे. तरी कसाल न्यू इंग्लिश स्कूलसमोर महामार्गालगत सर्व्हीस रोड व क्रॉसिंग रोड तयार करावा. अन्यथा 6 ऑक्‍टोबरला कसाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक विद्यार्थ्यासमवेत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा पंचायत समिती सदस्य हरमळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT