Devendra Fadnavis visit to Dapoli Mandangad on Friday
Devendra Fadnavis visit to Dapoli Mandangad on Friday 
कोकण

देवेंद्र फडणवीस उद्या दापोली, मंडणगडला देणार भेट ; असे आहे नियोजन.....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली, मंडणगड तालुक्यातील सहा गावांना उद्या भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे कोकणातील आमदारही आहेत. या दौर्‍यात ग्रामस्थांना भाजपच्या वतीने या सुमारे दोन कोटी रुपयांची अन्नधान्य, साधनसामग्री वितरित केली जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.


शासकीय विश्रामगृहात झालेल्या परिषदेत ते म्हणाले, महाडपासून श्री. फडणवीस यांचा दौरा सुरू झाला आहे. उद्या सकाळी 10 वाजता ते वेळास व अन्य दोन गावांना भेट देतील. तिथून ते आंजर्ले, पाजपंढरी व आणखी काही गावांना भेट देऊन नुकनानग्रस्तांचे दुःख जाणून घेतली. सायंकाळी दापोली येथील नगरपंचायत हॉलमध्ये जिल्हाधिकारी, प्रांताधिकार्‍यांकडून आढावा मदत व एकंदरीत स्थितीचा घेतील. त्यानंतर पत्रकारांशीही ते वार्तालाप करणार आहेत.


श्री. फडणवीस यांना गतवर्षी कोल्हापूर, सांगली येथील पुराच्या वेळी राष्ट्रीय आपत्तीचा अध्यादेश काढला होता. त्यामुळे तातडीची मदत वाढवली, तसेच पंचनाम्यासाठी अन्य यंत्रणेचा उपयोग करून घेऊन भरपाई देण्याचे आदेश दिले होते. आम्ही मागणी केल्यानंतर 95 हजाराची भरपाई आता शासनाने दीड लाखांवर नेली आहे. श्री. फडणवीस यांच्या दौर्‍यानंतर ती तीन लाख रुपयांवर पोहोचेल.फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बाल्दी, आमदार प्रसाद लाड व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, अ‍ॅड. दीपक पटवर्धन सहभागी होणार आहेत.


हेक्टरी नव्हे झाडानुसार मदत द्या  

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना हेक्टरी मदत नको तर कोकण कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे प्रतीझाड मिळावी. शासनाने दिलेली मदत तुटपुंजी असून उद्ध्वस्त झालेल्या बागा साफ करण्यासाठीच 75 कोटींची मदत संपून जाईल. मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना डिझेल परतावा, जाळीसाठी घेतलेले व व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जातून दिलासा मिळाला पाहिजे, अशी मागणी आमदार लाड यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT