electric railway engine run on konkan railway route in ratnagiri
electric railway engine run on konkan railway route in ratnagiri 
कोकण

VIDEO - अखेर विजेवरचं इंजिन धावलं; आता प्रतीक्षा रेल्वेची

राजेश कळंबटे

रत्नागिरी : झुक - झुक, झुक - झुक आगीन गाडी..... धुरांच्या रेषा हवेत काढी....... हे गाणं आजच्या आधुनिकीकरणात लुप्त होणार असच चित्र आहे. कोकण रेल मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांना जोडलेले डिझेल इंजिन लवकरच कालबाह्य होणार आहे. रोहा ते वेर्णा अशा या मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रत्नागिरी ते रोहा या मार्गावरील बहुतांशी काम आटोपले असून गाडी चालवण्यासाठी आवश्यक्य त्या चाचण्या करण्यास सुरुवात झाली आहे. 

डिझेल इंजिन चालवताना त्यातून बाहेर पडणारा धूर आणि त्यातून होणारे पर्यावरण प्रदूषण याला पर्याय काढला जात आहे. तो म्हणजे विद्युतीकरणाचा होय. गेले चार दिवस रत्नागिरी ते रोहा मार्गांवर विजेवरील इंजिन चालवून चाचणी घेण्यात येणार असल्याची वार्ता येत होती. सगळ्यांनाच उत्सुकता होती. मुंबई मध्ये अशा गाड्या सर्वांनीच पाहिल्यात. पण दऱ्या खोऱ्यातून जाणारा कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण हे एक आव्हान होते. ते पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सरसावले. 

डिसेंबर 2018 रत्नागिरी तुन विद्युतीकरणाचे काम सुरु झाले. दोन वर्षात ते पूर्ण करण्यात यश आले. गुरुवारच्या मुहूर्तावर पहिले विजेवरील इंजिन या मार्गांवर धावले. रोहा येथून या इंजिनचा प्रवास सुरु झाला. पूल आणि नियमित रुळावरून व्यवस्थितपणे नियमित वेगाने ही गाडी धावली. ना धूर, ना गाडीचा आवाज असा प्रवास गुरुवारी या विजेवरील इंजिनचा झाला.

आता प्रतीक्षा आहे, ती रेल्वे गाडी धावण्याची. इंजिनची चाचणी अपेक्षेपेक्षा यशस्वी झाल्यामुळे सर्वांनी निःश्वास सोडला. इंजिनवरील लोकोमधेच बंद पडला किंवा कोणती समस्या निर्माण झाली तर नियमित वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी डिझेल इंजिन ही त्या मागे जोडले होते. पण डिझेल इंजिन चालवण्याची वेळ लोको पायलटवर आलीच नाही. पुढील दोन महिन्यात कदाचित सर्वच गाड्या विजेवर चालतील. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT