pali
pali 
कोकण

आकर्षक व दुर्मिळ फुलपाखरांचा जिल्ह्यात मुक्त संचार 

अमित गवळे

पाली - आकर्षक आणि दुर्मिळ ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखरु जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. ते राज्याचे राज्य फुलपाखरु आहे. आकर्षक निळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रांग छटांचे व मखमली पंखांचे हे फुलपाखरु बघणार्यांचे लक्ष वेधते. 

हे फुलपाखरु फक्त भारत आणि श्रीलंका या देशातच आढळते. महाराष्ट्रात भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. आकाराने मोठे आणि वेगात उडते. फुलांमधील मकरंद गोळा करत हे विविध फुलांवर फिरत असते. यामुळे फुलांचे व प्रामुख्याने वेलचीच्या झाडाचे परागीभवन या फुलपाखराकडून होते. अळी अवस्थेत औषधी व लिंबू वर्गीय झाडांवरुन अन्न मिळवते. हे फुलपाखरु सावली टाळते, लख्ख सूर्यप्रकाशात दिसते. अनेक नर फुलपाखरु चिखल्याच्या डबक्या जवळ खनिज मिळविण्यासाठी गोळा झालेली दिसतात. असे हे राज्य फुलपाखरु त्याच्या विविध वैशिष्ट्यांमुळे विशेष ठरले आहे असे तज्ञाचे म्हणणे आहे. 

आकर्षक रंगसंगती, सर्वसामान्य फुलपाखरांपेक्षा आकाराने मोठे आणि पच्छिम घाटात आढळते यामुळे हे आपल्या राज्याचे राज्य फुलपाखरु आहे. जेवविविधतेच्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचे आहे. 7 वीच्या मराठी विषयाच्या पुस्तकाच्या मुख पृष्ठावर ब्ल्यू मॉरमॉनचे चित्र आहे. या फुलपाखराचे व त्याच्या नैसर्गिक आवासाचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. 
राम मुंढे, निसर्गप्रेमी व पर्यावरण तज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT