forest officer posting change frequently in mandangad ratnagiri post also empty
forest officer posting change frequently in mandangad ratnagiri post also empty 
कोकण

कृषी कार्यालय भाड्याच्या इमारतीत ; २२ वर्षांत बदलले २५ कृषी अधिकारी!

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्‍यास पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी हे पद मंजूर असतानाही गेल्या २२ वर्षात म्हणजेच १९९८ ते २०२० या कालावधीत तालुक्‍यात एकूण २५ तालुका कृषी अधिकारी मिळाले आहेत. यातील १५ अधिकाऱ्यांनी प्रभारी या नात्याने तालुका कृषी अधिकारी पदाचे काम पाहिले आहे. केवळ ४ अधिकाऱ्यांना पूर्णवेळ कृषी अधिकारी म्हणून काम करता आले.

२०१८ ते २०२० या दोन वर्षांचे कालावधी ९ वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची या पदावर विभागाने नियुक्ती केल्याने केवळ रजेच्या कालावधीतील जुळवा जुळवा करण्याकरिता हे पद निर्माण केले आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे.
तालुका कृषी अधिकारी ते पहारेकरी पदाचा विचार करता, आजही या कार्यालयात एकूण २४ पद रिक्त आहेत. यामध्ये तालुका कृषी अधिकारी १, कृषी अधिकारी २, वरिष्ठ लिपिक १, लिपिक ३, अनुरेखक ४, कृषि पर्यवेक्षक ४ , कृषि सहायक ६, वाहनचालक १, शिपाई १, पहारेकरी १ अशी चौवीस पदे रिक्त आहेत. कार्यालयात एकूण मंजूर पदे ५० असून यातील केवळ २६ पदे भरलेली आहेत. २४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा कार्यभार कार्यालयात उपलब्ध कर्मचाऱ्यांनाच सांभाळावा लागत असल्याने अधिक कामाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या नैमित्तिक कामकाजावर होतो.  

तब्बल १२ पदे रिक्त

गेल्या ९ महिन्यांपासून प्रोबेशनवरील अधिकारी प्रभारी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे कामकाज चालवत आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. कृषी अधिकारी गट ब व क  ही पदे २०१४ पासून तर कृषी पर्यवेक्षक हे पद २००९ पासून रिक्त आहे. मंडणगड मुख्यालय असणारी कार्यालयातील तब्बल १२ पदे रिक्त असल्याची बाबही स्पष्ट झाली आहे.

कृषी विकासाचे मॉडेल कधी?

राज्य शासनाच्या तालुका कृषी कार्यालयाचा कर्मचारी भरतीचा अनुशेष वर्षानुवर्षे मोकळाच राहिल्याने कार्यालयाचे माध्यमातून कृषी विकासाचे मॉडेल सादर करणाऱ्या प्रयोगांची तालुक्‍यास अद्याप प्रतीक्षा आहे.

कार्यालय भाड्याच्या इमारतीत..

तालुका कृषी कार्यालयास आजही स्वतःचे मालकीची जागा नाही. हे कार्यालय आजही भाडे तत्त्‍वावर असलेल्या इमारतीत आपल्या कामकाजाचा गाडा हाकत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT