Four Arrested In Illegal Wine Transport Sindhudurg Marathi News
Four Arrested In Illegal Wine Transport Sindhudurg Marathi News  
कोकण

लाॅकडाऊन असताना सुसाट जाणाऱ्या गाडीचा युवकाला आला संशय अन्...

सकाळवृत्तसेवा

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - लॉकडाऊनमुळे पोलिस व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत गोवा बनावटीची दारू मध्यरात्री चंदगडकडे घेवून जाणाऱ्या अडकूर येथील तिघा युवकांना कुंब्रल येथील युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी क्वालीस मोटार, एक दुचाकी आणि गोवा बनावटीच्या दारूसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

जागरूक युवकांनी पोलिसांना पकडून दिलेल्या दारूची गोव्यातील किंमत 95 हजार तर महाराष्ट्रातील किंमत 2 लाख 35 हजार 920 रुपये एवढी आहे. स्प्लेण्डर दुचाकीची किंमत दहा हजार तर क्वालीस गाडीची किंमत एक लाख रुपये आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत दारूसह 3 लाख 45 हजार 920 रुपये एवढी आहे. 

याबाबत गावकरी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी संबंधित गाडीतून गेले अनेक दिवस अधून मधून दोन दिवसाआड दारूची वाहतूक सुरु होती. गोव्यातील इब्रामपूर येथून सासोली मार्गे ती गाडी भिकेकोनाळ, रुमडाची गोठणमार्गे शिरवल, तळकट मार्गे कुंभवडेतून चंदगडला जात असे. सगळीकडे लॉकडाऊन असताना ती गाडी अधूनमधून आणि सुसाट वेगाने जात असल्याने रुमडाची गोठण येथील युवकांना संशय आला. शनिवारी बोर्डेकरवाडी येथील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबी बोर्डेकर यांच्या वहिनीचे निधन झाले होते.

त्यांच्यावर उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आल्याने बहुतेक युवक जागेच होते. त्यांनी मराठी शाळेजवळून कुंब्रलकडे जाणारा मार्ग बंद केला तर शिरवलकडे जाणारा रस्ता सुरु ठेवला. तो रस्ता अरुंद असला तरी दारू वाहतूक करणाऱ्यांच्या सवयीचा होता. त्या रस्त्यावर सर्वजण थांबले. मध्यरात्री एकच्या दरम्यान क्वालीसला एस्कॉर्ट करणारी दुचाकी आली, पाठोपाठ क्वालीस, रुमडाची गोठण व बोर्डेकरवाडी येथील युवकांनी त्यांना घेरले. गाडी थांबवली आणि पाहतात तर काय, क्वालीसमध्ये (एम. एच. 14 एई 3256) दारूचे बॉक्‍स खचाखच भरलेले. त्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांना फोन करुन पोलिसांना तत्काळ पाठवण्यास सांगितले. त्यानंतर पोलिस आले. त्यांनी त्या तिघांना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेऊन येथील पोलिस ठाण्यात आणले. त्या तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक कुलदीप पाटील व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ती कारवाई केली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT