गणपतीपुळे
गणपतीपुळे 
कोकण

गणपतीपुळे किनाऱ्यावर होणार ‘रेड झोन’चे जाळं

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे (Ganpatipule) किनारी पोहण्यास धोकादायक असलेला भाग रेड झोन म्हणून तयार केला जाणार आहे. तसेच किनारी भागात जादा जीवरक्षक, पोहणार्‍यांना लाईफ जॅकट, सीसीटीव्ही कॅमेरे यांसह भरती-ओहोटीच्या वेळा दर्शवणारे फलक येत्या काही दिवसात उभारण्यावर पोलिस प्रशासन, गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली.

गणपतीपुळे किनारी गुरुवारी (ता. १६) दोन पर्यटक समुद्रामध्ये पोहताना बुडाले. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आले. हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीत बैठक झाली. या वेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, जयगड सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर, सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदारी, गणपतीपुळे मंदिर देवस्थानचे अमित मेहंदळे, जीवरक्षक, पोलिस मित्र व काही ग्रामस्थ उपस्थित होते.

गणपतीपुळे किनारी २००७ पासून आतापर्यंत बेचाळीसहून अधिकजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गेल्या तीन वर्षात एकही प्रकार घडलेला नव्हता. गणपतीपुळेमध्ये पुन्हा बुडण्याचा प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजना सुचवल्या आहेत. किनाऱ्यावर आतापर्यंत किती मृत्यू झाले त्याचे फलक आणि भरती-ओहोटीचे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. मेगा फोन आणि जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

सध्या दहा जीवरक्षक ग्रामपंचायतीकडून ठेवण्यात आले आहेत. मंदिर व्यवस्थापनही दोन सुरक्षा रक्षक नेमते. पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात येणार आहे. तसेच किनाऱ्यावरील धोकादायक स्पॉट ठरवून तेथे लाल झेंडे लावले जातील. देवस्थानकडून सीसीटीव्ही लावण्यात आले होते. ते खराब झाले असून पुन्हा ते सुरू करण्यात येणार आहेत. एमटीडीसीच्या जवळ दोन वॉच टॉवर आणखीन नव्याने लावले जाणार आहेत. तसेच तात्पुरत्या बोटी ठेवण्यावरही चर्चा झाली. यासाठी लागणारा निधी कोणत्या फंडातून खर्च करावयाचा याचेही नियोजन करण्याबाबत देसाई यांनी सूचना केल्या.

बोटींग सुरू असते तर....

गणपतीपुळेत समुद्रात पर्यटकांसाठी बोटींग सुविधा आहे. कोरोनामुळे बोटींग बंद असल्याने गुरुवारी पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. बोटींग सेवा सुरू असती तर त्याला वेळेत वाचवणे शक्य झाले असते, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

गणपतीपुळे किनारी बुडून मृत्यूचे पुन्हा प्रकार घडू नयेत यासाठी चर्चा झाली आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल.

- जे. एच. कळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT