Gava Killed And Burned In Kokisare Sindudurg Marathi News
Gava Killed And Burned In Kokisare Sindudurg Marathi News  
कोकण

गवा ऊसशेतीचे नुकसान करतो म्हणून...

सकाळवृत्तसेवा

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - ऊसशेतीचे नुकसान करीत असल्यामुळे कळपातील एका गव्याची हत्या करून त्याची जाळून विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार वैभववाडी तालुक्‍यातील कोकिसरे-नारकरवाडी येथे घडला. या प्रकरणी वन विभागाने दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची वन कोठडी देण्यात आली.

दीपक रंगराव चव्हाण (वय 39, रा. बावेली, गगनबावडा जि. कोल्हापूर, सध्या रा. नारकरवाडी, ता. वैभववाडी), रवींद्र हरी भागण (44, रा. नारकरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

कोकिसरे-नारकरवाडी येथे दीपक चव्हाण यांची ऊसशेती आहे. ऊसशेतीचे गेल्या काही दिवसांपासून गव्यांकडून नुकसान सुरू आहे. 14 ते 15 गव्यांचा कळप ऊसशेतीत घुसून नुकसान करीत असल्यामुळे चव्हाण आणि भागण शेतीची राखण करायचे. दोघे 20 फेब्रुवारीला देखील ऊसशेतीची राखण करण्यासाठी गेले होते. रात्री आठ वाजता गव्यांचा कळप शेतीत घुसला. चव्हाण आणि भागण यांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु कळपातील एक गवा त्या दोघांच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे चव्हाण यांनी आपल्याकडील बंदुकीने गव्यावर गोळी झाडली. यामध्ये गवा जागीच ठार झाला.

पाच-सहा दिवस गवा ऊसशेतीनजीक पडून होता. त्यानंतर त्याला दुर्गंधी सुटली. त्यामुळे गव्याला जाळण्याचा प्रयत्न दोघांनी केला. ही माहिती वन विभागाचे वनपाल एस. एस. वागरे यांना मिळताच त्यांनी ही माहिती कणकवलीचे वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर यांना दिली. त्यानंतर या प्रकरणाचा गुप्त तपास वन विभागाने केला. श्री. सोनवडेकर, श्री. वागरे, वनरक्षक अमित काकतीकर, प्रकाश पाटील, किरण पाटील यांनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना मृत गव्याचे अवशेष आढळून आले. त्यानुसार पंचनामा केला. वन विभागाने संशयित म्हणून चव्हाण यांना शुक्रवारी (ता. 28) रात्री उशिरा तर भागण यांना आज सकाळी ताब्यात घेतले. त्यांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांनाही तीन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे. 

बंदूक, मोबाईलचा शोध सुरू 

ज्या बंदुकीतून गव्यावर गोळी झाडण्यात आली, ती बंदूक अद्याप वन विभागाच्या हाती लागलेली नाही. ती बंदूक नेमकी कुणाची आहे, ती परवानाप्राप्त आहे की चोरटी, याचा तपास पोलिस करीत आहेत. याशिवाय दोन्ही संशयितांचे मोबाईल वन विभागाला हवे आहेत. यातील काही मुद्‌द्‌यांना धरून आज कणकवली न्यायालयात सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य मानत संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. 

वन विभाग सतर्क 

गेल्या काही महिन्यांपासून वन विभाग सतर्क झाला आहे. बिबट्याचे कातडे विक्री, खवले मांजर तस्करी अशा दोन गुन्ह्यांनंतर आता हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT