गावाची बांधिलकी
गावाची बांधिलकी 
कोकण

गावाची बांधिलकी: 70 वर्षांची परंपरा साखरीआगरने राखली कायम

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील उमराठ गावाप्रमाणे साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे या गावातील सामाजिक सलोखा तुटणार काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या समाजाने गावाशी असलेली बांधिलकी जपत सरपंचपदाचा आग्रह सोडला. परिणामी ग्रामपंचायत स्थापनेपासून निवडणूक न करण्याची 70 वर्षांची परंपरा कायम राहिली. 

साखरीआगर गावातील प्रभाग क्र. 1 व 2 मधून एकाच समाजाचे 5 ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात. उर्वरित 4 सदस्यांपैकी 1 सदस्य प्रभाग 2 मधून व 3 सदस्य प्रभाग 3 मधून निवडून येतात. निवडणुकीपूर्वी दोन वेळा गावकी बसते आणि सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची नावे निश्‍चित करते. सरपंचपद आळीपाळीने एकेका समाजाला दिले जाते. यावर्षी साखरीआगर ग्रामपंचायचीच्या सरपंचपदाची संधी भंडारी समाजाला होती. मात्र बहुसंख्येने असलेल्या समाजाने निवडणुकीसाठी झालेल्या पहिल्या बैठकीत सरपंच आमचाच असला पाहिजे असा हट्ट धरला. बैठकीत या समाजाला समजाविण्याचा प्रयत्न झाला. 

मात्र समाजाच्या पुढाऱ्यांनी जेथे आपली लोकसंख्या जास्त तेथे आपलाच सरपंच झाला पाहिजे असा आग्रह केला असल्याचे सांगण्यात आले. अखेर अन्य समाजांनी सर्वच ग्रामपंचायत सदस्य तुम्ही निवडून आणा. आम्ही अन्य ठिकाणी उमेदवार उभे करणार नाही. निवडणूक लागली तर मतदानही करणार नाही, अशी भूमिका घेत पहिली बैठक संपली. हा निर्णय अन्य समाजातील प्रत्येकापर्यंत पोचविण्यात आला. गावातील वातावरण अस्वस्थ झाले. बहुसंख्येने समाजाचे अन्य समाजाशी असलेल्या नात्यात अदृश्‍य दरी निर्माण झाली. काही समजुतदार मंडळींनी समाजाच्या पुढाऱ्यांपर्यंत विषय नेला. सर्वाधिक वेळा समाजाचा सरपंच झाल्याचे निदर्शनास आणून दिले. 

आधी गावाची बांधिलकी
पुन्हा गावकी बसली. गावातील सामाजिक सलोखा कायम राहिला पाहिजे. आधी गावाची बांधिलकी मग तालुक्‍यातील समाज असा विचार बहुसंख्येने असलेल्या समाजाच्या पुढाऱ्यांनी मांडला. त्याचे गावाने स्वागत केले. पुन्हा जुन्या सूत्राप्रमाणे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या 70 वर्षांची परंपरा अशा रितीने राखली गेली.

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT