kokan today update,kokan live news, kokan marathi news,kokan news 
कोकण

राष्ट्रवादीची सत्ता राखण्यासाठी कसरत; आजी-माजी आमदारांमध्ये रंगणार राज

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : महाआघाडीतील तीन घटक पक्षांच्या ताब्यातील सर्वच ग्रामपंचायती या त्यांच्या पारंपरिक बालेकिल्ले असून अनेक वर्षांपासून या पक्षांच्याच ताब्यात आहेत. प्रत्येक गावात त्या, त्या पक्षाचे मतदान वॉर्ड व कोंडनिहाय बांधलेले आहेत. विद्यमान निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या पांरपरिक ग्रामपंचायतीत सत्ता राखण्यास बरीच कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. आजी-माजी आमदारांच्या तालुक्‍यातील सक्रिय राजकारणाचा मोठा प्रभाव या निवडणुकांवर पडण्याचीच शक्‍यता आहे.

तालुक्‍याच्या राजकारणाचा विचार करता शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही प्रादेशिक अस्मिताचे पक्षांनी तालुक्‍याचे गेल्या दशकातील राजकारण गाजविले आहे. या दोन्ही पक्षांकडे ग्रामीण भागात विस्ताराकरिता आवश्‍यक असणारे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. भाजपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष या दोन पक्षांच्या जवळपास पोहचलेले नाहीत. 


नव्या गणितात या तिन्ही पक्षांनी ग्रामीण भागात म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरही आघाडी केल्यास, त्याचे परिणाम सत्तातरांच्या गणितावर नक्कीच होणार आहेत. एकत्रित निवडणुकीमुळे पक्षांची पांरपरिक व्होट बॅंक गायब होण्याचा धोका आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संजय कदम यांचा पराभव झाल्यानंतर आजी आमदार योगेश कदम या दोघांमधील राजकीय संघर्ष निदान मंडणगड तालुक्‍यात तरी टिपेला पोहचल्याचे दिसून आला आहे. 


राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या दोघांनीही आपले पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्याचे आवाहन बदलत्या राजकीय परिस्थितीतही स्वीकारावे लागणार आहे. पक्षांचे बदलेले धोरण लक्षात घेता दोन्ही पक्षांना स्वतःचा अजेंडा या निवडणुकांमध्ये राबविता येणे शक्‍य नसले तरी दोन्ही पक्षांतील क्रमांक एकच्या लढाईचे संघर्ष अगदी महाआघाडीच्या राजकारणातही दिसून येण्याची शक्‍यता अधिक आहे. बदललेल्या समीकरणात पारंपरिक मतदार टिकवत नवीन मतदार कसा जोडला जाईल, यांचे भानही दोन्ही पक्षांना ठेवावे लागणार आहे. 

कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही
महाआघाडीचा प्रयोग, क्रमांक एकची लढाई, गेल्या वर्षाभरात दोन्ही पक्षांकडून झालेली कामे व दोन्ही पक्षांची कोव्हिड व निसर्ग चक्रीवादळाची कालावधीतील कार्यशैली लक्षात घेताही तालुक्‍यात महाआघाडी म्हणून या तिन्ही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय आढळून आलेला नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचे कोणतेही पडसाद स्थानिक पातळीवरील राजकारणावर झालेला दिसून आलेला नाही. प्रसंगी सत्ताधाऱ्यांमधील विविध कारणांसाठीचा संघर्षच येथील जनतेने अनुभवला आहे. 

महाआघाडी झाली तरी अडचणच...
तालुक्‍यात एकूण ४९ ग्रामपंचायतीपैकी १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. याचा अर्थ २५ टक्के ग्रामपंचायतीमधील लढाई एका अर्थाने वर्चस्वाची लढाई म्हणावी लागेल. वरिष्ठांच्या दबावामुळे महाआघाडीच झालीच तर इच्छेने नव्हे तर आदेशाची अंमलबजावणी म्हणून होईल. कारण प्रत्येक ग्रामपंचायतीत दोन्ही पक्षांचे ग्रामपंचायत सदस्य निवडून येण्याचे प्रभाग निश्‍चित आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणात आयुष्यभर विरोध केलेल्यांना स्वतः प्रवेश देणे, खालच्या पातळीवरील कार्यकर्त्यांचे पचनी पडणारे नाही.


१५ ग्रामपंचायती व पक्षीय प्राबल्य 
भोळवली (राष्ट्रवादी), घोसाळे (राष्ट्रवादी), पालघर (राष्ट्रवादी), पाट (शिवसेना), शिरगाव (शिवसेना), कादवण (काँग्रेस), पालवणी (राष्ट्रवादी), जावळे (राष्ट्रवादी), चिंचघर (शिवसेना), सावरी (शिवसेना), गोठे (राष्ट्रवादी), पेवे (राष्ट्रवादी), उमरोली (शिवसेना), म्हाप्रळ (राष्ट्रवादी), वेळास(शिवसेना).

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT