सुरुवातीला फक्त दोन रुपये पाठवा आणि ओटीपी आला तर सांगा, असे सांगून घोळात घेतले sakal
कोकण

गुहागर : दोन रुपये पाठवले;अन् गमावले ९४ हजार!

कुरिअरसाठी दिली लिंक ओटीपी सांगून फसले

सकाळ वृत्तसेवा

गुहागर: आमच्या कंपनीत कुरिअर करण्यासाठी नोंदणी करावी लागते. आम्ही पाठवतो त्या लिंकवर नोंदणी करा. सुरुवातीला फक्त दोन रुपये पाठवा आणि ओटीपी आला तर सांगा, असे सांगून घोळात घेतले. अनेकदा व्यवहार करणाऱ्या या व्यक्तीनेही अनाहूतपणे ओटीपी सांगितला आणि अवघ्या १० मिनिटांत बँक खात्यातून ९३ हजार ९९९ एवढी रक्कम लुटली गेली.

हा प्रकार शनिवारी (ता. ९) हेदवतड येथे घडला. गुहागर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधित केसरी विश्वनाथ नागवेकर (वय ४३) यांनी याबाबतची तक्रार गुहागर पोलिस ठाण्यात केली आहे. या तक्रारीनुसार, हेदवतड येथे आलेल्या केसरी नागवेकर यांच्या पत्नीला पुण्याला तातडीने कुरिअर पाठवायचे होते. म्हणून त्यांनी गुगल सर्चवर कुरिअर कंपनी शोधली. त्या कंपनीच्या माहितीत एक मोबाईल क्रमांक सापडला. त्या मोबाईलवर त्यांनी फोन केला; मात्र हा फोन कोणीही उचलला नाही.

पाच मिनिटांच्या अवधीत नागवेकर यांना अन्य मोबाईलवरून फोन आला. तुम्ही कुरिअरची चौकशी करत आहात ना? आमचा तो फोन बंद आहे, असे सांगून मोबाईलवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तुम्हाला कुरिअर करायचे असेल, तर तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल. तुमच्या मोबाईलवर मी लिंक पाठवत आहे. त्याद्वारे तुम्ही नोंदणी करा. तसेच देवघेवीचा व्यवहार पडताळण्यासाठी फक्त २ रु. पाठवा, असे सांगितले.

सौ. नागवेकर यांनी आपल्या पतीला ही सर्व गोष्टी सांगितली. लगेच नागवेकर यांनी लिंक उघडली. नोंदणीचा फॉर्म भरत असताना पुन्हा अज्ञात व्यक्तीचा चौकशीसाठी फोन आला. त्याने गप्पांच्या ओघात २ रुपये पाठविण्यासाठी बँकेतून आलेला ओटीपी विचारला. नागवेकर यांनी अनाहूतपणे ओटीपी दिला. त्यानंतर थोड्या वेळाने नागवेकर यांच्या बँक खात्यातून ४९ हजार ९९९ रुपये काढले गेल्याचा संदेश आला. त्यावेळी नागवेकर यांना आपण केलेली चूक आठवली. इतक्यात पुन्हा ४४ हजार काढल्याचा संदेश आला. एकूण ९३ हजार ९९९ रुपये नागवेकर यांच्या खात्यातून काढण्यात आले. केसरी नागवेकर यांनी याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: बिंदुसरेत आढळला चिमुरडीचा मृतदेह; बीड शहरामधील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

Gadchiroli News: पावसात धानाचे पुंजणे वाचवताना १७ वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; कोरची तालुक्यातील शेतातील दुर्घटना

Latest Marathi News Live Update : नाशकात ट्रकच्या धडकेत पादचाऱ्यांचा मृत्यू

Vote Theft: निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

औरंगाबाद नाही, आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक; अधिकृत बदल, नवा कोडही जारी

SCROLL FOR NEXT